दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:02 PM2019-09-02T13:02:17+5:302019-09-02T13:04:11+5:30

अनेकदा दररोजच्या पदार्थांचा कंटाला येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत.

Recipe Of Healthy sweet recipes for Breakfast | दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

Next

अनेकदा दररोजच्या पदार्थांचा कंटाला येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत. शेफ मनिष मल्होत्रा यांच्या या रेसिपी असून आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच या पदार्थांचा तुम्ही नाश्त्यामध्येही समावेश करू शकता. 


१. मसालेदार आल्मंड बनाना जॅगरी केक

साहित्य : 

  • लोणी, मीठरहित अर्धा कप
  • गुळाची पावडर  अर्धा कप
  • दालचिनी बारीक दीड चमचा 
  • जायफळ बारीक १/४ चमचा 
  • बदाम कापलेले अर्धा कप
  • साखर ३/४ कप 
  • अंडी मोठी  ३ नग
  • संत्र्याची साल  २ चमचे
  • केळी पिकलेली आणि कुस्करून १ १/४ कप
  • मैदा ३ कप
  • बेकिंग पावडर १ १/२ चमचा 
  • बेकिंग सोडा १ चमचा  
  • मीठ अर्धा चमचा 
  • ताक २/३ कप 

पद्धत:

- १/४ कप लोणी वितळवून घ्या. 

- २ चमचे वितळलेले लोणी ८ कप पॅनमध्ये ओता. 

- लोणी पॅनच्या दोन्ही बाजूंना आणि तळाला पुसून घ्या. गूळ, दालचिनी, जायफळ आणि बदाम एकत्र करा. पॅनच्या तळाला अर्धे गुळाचे मिश्रण भुरभुरा. उर्वरित मिश्रण उर्वरित वितळलेल्या लोण्यासोबत एकत्र करा. बाजूला ठेवा. 

- मोठ्या बाऊलमध्ये उर्वरित १/४ कप लोणी बारीक केलेल्या साखरेसोबत मिश्रित होईपर्यंत लावा. अंडी फेटून घ्या, एका वेळी एक अशा रितीने फेटून होईपर्यंत. कुस्करलेली केळी फेटून घ्या. 

- मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि मीठ मिश्रण करा. केळ्याचे मिश्रण ताक, ब्लेंड होईपर्यंत हलवा. 

- अर्धे मिश्रण तयार केलेल्या पॅनमध्ये ओता. उर्वरित गूळ साखरेचे मिश्रण समानपणे वर घाला, उर्वरित मिश्रणाने झाका. 

- लांब लाकडी काठी केकमध्ये घातल्यास स्वच्छ होईपर्यंत १८० अंश ओव्हनवर सुमारे ५० मिनिटे भाजा. केक रॅकवर ५ मिनिटे थंड करा. मग केक सर्व्हिंग प्लेटमध्ये घ्या. केक गरम किंवा थंड वाढा. 

२. आल्मंड अँड होली बेसिल ठंडाई

साहित्य : 
                

  • बदाम भिजवून साल काढलेले     २ चमचे 
  • भिजवलेल्या कलिंगडाच्या बिया २ चमचे
  • भिजवलेली खसखस १ चमचा
  • आल्मंड स्लिव्हर्स अर्धा कप
  • साखर १/४ कप
  • केशर काडी चिमूटभर
  • तुळशीची पाने    ४ नग 
  • दूध २ कप
  • हिरवी वेलची पावडर १/२ चमचा 
  • काळी मिरी १/२ चमचा 
  • भिजवलेले फेनेल दाणे १/४ कप

 

पद्धत:

- बडिशेप, खसखस आणि बदामाची मऊ पेस्ट बनवून घ्या. 

- जड बुडाच्या पॅनमध्ये दूध आणि केशरकाड्या उकळून घ्या. साखर दुधात विरघळवून घ्या. 

- ताजी तुळशीची पाने आणि काळीमिरी बारीक पेस्ट करून दुधात मिसळा. 

- बदाम, खसखस, आणि बडिशेपाची पेस्ट वेलची पावडर आणि बदामाच्या तुकड्यांसह दुधात मिसळा आणि २-३ मिनिटे उकळू द्या. 

- ठंडाई फ्रिजमध्ये ठेवा. 

Web Title: Recipe Of Healthy sweet recipes for Breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.