थोडीशी हटके आणि हेल्दी गाजराची कोशिंबीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:50 IST2018-11-30T18:49:36+5:302018-11-30T18:50:40+5:30
फळं आणि भाज्या कच्च्या खाव्या हे आपण नेहमीच ऐकत असतो. अनेकदा आहारामध्ये सलाडचा समावेश करा असा डॉक्टरांकडूनही असा सल्ला देण्यात येतो. परंतु अनेकजण हे खाणं टाळतात.

थोडीशी हटके आणि हेल्दी गाजराची कोशिंबीर!
फळं आणि भाज्या कच्च्या खाव्या हे आपण नेहमीच ऐकत असतो. अनेकदा आहारामध्ये सलाडचा समावेश करा असा डॉक्टरांकडूनही असा सल्ला देण्यात येतो. परंतु अनेकजण हे खाणं टाळतात. कुणाला सलाड किंवा कोशिंबीरीमध्ये वापरण्यात येणारा कांदा आवडत नाही. तर कुणाला काकडी, बीट आवडत नाही. अशावेळी हेल्दी कोशिंबीर तयार करण्यासाठी तुम्ही हटके पद्धतीने कोशिंबीर तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी गाजराची कोशिंबीर तयार करण्याची सहज आणि सोपी रेसिपी...
साहित्य :
- 2 वाट्या गाजराचा किस
- 1 वाटी डाळिंबाचे दाणे
- 1 चमचा खसखस
- 1 चमचा मीठ
- अर्धा चमचा साखर
- पाव चमचा लाल तिखट किंवा मिरपूड
- 1 वाटी मेयोनिझ
- अर्धी वाटी सायीचे दूध
कृती :
- गाजराची कोशिंबीर तयार करताना सर्वात आधी गाजर धुवून त्यांची साल काढून घ्यावी.
- त्यानंतर गारज किसणीने किसून घ्यावे.
- एका बाउलमध्ये गाजराचा किस आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करावे.
- त्यानंतर त्यामध्ये खसखस, लाला तिखट, साखर, मीठ एकत्र करून घ्यावे.
- तयार मिश्रणामध्ये मेयोनिझ आणि दूध घालून एकत्र करावे.
- हेल्दी आणि हटके गाजराची कोशिंबीर तयार आहे.