आरोग्यदायी असे राजगिऱ्याचे लाडू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 19:35 IST2018-12-11T19:34:49+5:302018-12-11T19:35:38+5:30
हिवाळ्यामध्ये राजगिऱ्याचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरतात. परंतु हे बाजारातून विकत आणण्याऐवजी घरीच तयार केले तर ते अधिक फायदेशीर ठरतं. तयार करण्यासाठी सोपे असण्यासोबतच हे खाण्यासाठीही अत्यंत चविष्ठ असतात.

आरोग्यदायी असे राजगिऱ्याचे लाडू!
हिवाळ्यामध्ये राजगिऱ्याचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरतात. परंतु हे बाजारातून विकत आणण्याऐवजी घरीच तयार केले तर ते अधिक फायदेशीर ठरतं. तयार करण्यासाठी सोपे असण्यासोबतच हे खाण्यासाठीही अत्यंत चविष्ठ असतात. राजगिऱ्यामध्ये प्रोटीन, अॅन्टी-ऑक्सिडंट, मिनरल्स असतात. तसेच राजगिरा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतो. जाणून घेऊया टेस्टी आणि कुरकुरीत होममेड राजगिऱ्याचे लाडू तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- राजगिरा एक कप
- गुळ एक कप
- तूप 2 चमचे
- पाणी 2 चमचे
कृती :
- सर्वात आधी एखा पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा राजगिरा फुलेपर्यंत भाजून घ्या.
- राजगिऱ्याच्या लाह्या चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्या. त्यानंतर लाह्या आणि राजगिरा एकत्र करून घ्या.
- दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून गुळ आणइ 2 चमचे पाणी एकत्र करून शिजवून घ्या.
- गुळ विरघळल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून बाजूला ठेवा.
- राजगिरा आणि तयार गुळाचा पाक व्यवस्थित एकत्र करा.
- तयार मिश्रणाचे लाडू तयार करा.
- आरोग्यदायी असे राजगिऱ्याचे लाडू तयार आहेत.