झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:51 PM2019-10-05T12:51:50+5:302019-10-05T12:56:26+5:30

आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जेवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात.

Poha cutlet recipe in marathi how to make poha cutlet at home video | झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट'

झटपट तयार होणारे आणि पटकन फस्त होतील असे 'पोह्यांचे कटलेट'

googlenewsNext

(Image Credit : Archana's Kitchen)

आपल्या घरांमध्ये नाश्ता म्हटलं की, पोहे... हे समीकरणचं जुळून आलं आहे. नाश्त्यासाठी अनेक घरांमध्ये पोहे तयार केले जातात. हे जेवढ्या साध्या पद्धतीने तयार करण्यात येतात. तेवढेचं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे पचण्यासाठी अत्यंत हलके असतात. तुम्ही पोहे तयार करताना यामध्ये भाज्या, शेंगदाणे एकत्र करू शकता. ज्यामुळे पोहे आणखी पौष्टिक करण्यास मदत होते. 

खरं तर पोहे म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत किंवा कांदा पोहे पण घरोघरी पोहे व्हायलाच हवे.

पण तुम्हाला माहीत आहे का? पोह्यांपासून तुम्ही अनेक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार करू शकता. तुम्ही कधी पोह्यांपासून तयार होणाऱ्या कटलेटबाबत ऐकलं आहे का? पोह्यांपासून तयार करण्यात आलेले कटलेट्स तयार करण्यास अगदी सोपे आहेत. यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. कारण हे एक हेल्दी आणि लो-कॅलरी स्नॅक्स आहे. नाश्त्यामध्ये स्नॅक्स म्हणून पोह्यांचे कटलेट्स तयार करायचे असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठीच... 

पोह्यांचे कटलेट्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • एक कप पोहे
  • 2 चमचे मैदा 
  • तीन उकडलेले बटाटे
  • तेल 
  • राय
  • बारिक चिरलेला कांदा 
  • लाल मिरची पावडर 
  • हिरवी मिरची 
  • हळद 
  • आमचूर पावडर 
  • मीठ 

 

पोह्यांचे कटलेट्स तयार करण्याची कृती  : 

- पोहे पाण्याने धुवून व्यवस्थित स्वच्छ करा. 

- एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राय, कांदा आणि मैदा एक ते दोन मिनिटांसाठी फ्राय करून घ्या. 

- मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर लाल मिरची पावडर, हळद आणि कापलेली हिरवी मिरची एकत्र करा. व्यवस्थित एकत्र जाल्यानंतर एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या. 

- आता या मिश्रणात पोहे, कोथिंबीर, कापलेले काजू आणि लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रणाला कटलेटचा आकार देऊन तेलामध्ये गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. 

- गरमा गरम पोह्यांचे कटलेट तयार आहेत. पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबत सर्व करू शकता. 

Web Title: Poha cutlet recipe in marathi how to make poha cutlet at home video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.