शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

एका मिरचीचा जगभरातला प्रवास..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 06:07 IST

Food: ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण.

-  मेघना सामंत (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही म्हण अस्तित्वात आली ती मिरच्यांच्या संदर्भात. अवघ्या पाचेकशे वर्षांपूर्वी भारतात आगमन होण्यापासून ते आज भारत लाल मिरच्यांचा जगातला सर्वात बडा निर्यातदार बनण्यापर्यंतचा हा  प्रवास भलताच नवलपूर्ण. सोळाव्या शतकापर्यंत भारतीय उपखंडाला मिरची कशी असते हेच ठाऊक नव्हतं असं म्हटलं की, आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. पण खाद्य इतिहासकारांचं एकमत आहे की, भारतीय स्वयंपाकाला पोर्तुगीजांनीच मिरचीचा परिचय घडवला. तिकडे कोलंबस चटकदार मसाल्यांच्या शोधात निघालेला. विशेषतः भारतीय काळ्या मिरीच्या. पण त्याचं तारू भरकटलं आणि तो पोचला मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यावर. तिथे इतरही भरपूर एक्झॉटिक झाडा-पिकांची मांदियाळी त्याची वाट पाहत होती म्हणा. पण, सगळ्यात आवडली ती मिरची.काळ्या मिरीशी या मिरचीचा झणका थोडा मिळताजुळता. काळी नाही तर नाही, हिरवी चालेल म्हणून हिलाच ‘पेपर’ हे नाव चिकटलं. तिथून मिरची युरोपला पोचली. सपक फिरंगी जेवणाला मिरचीची गरजच होती. त्या काळात भारतीय काळ्या मिरीचे भाव युरोपात सोन्याच्या तोडीचे झालेले, अशा वेळी थोड्या फिकट कॅप्सिकमचा पर्याय त्यांना पसंत पडला.तिथून मग मिरचीची भ्रमंती सुरू झाली. भारतातही तिचा प्रवेश झाला तो पोर्तुगीजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्यावेळी. इथे आधी काळ्या मिरीशी ओळख असल्यामुळे या नव्या तिखट शेंगेला ‘मिरशेंग/ मिरश्यांग’ असं नाव पडलं. त्यावरूनच आला ‘मिरची’ हा शब्द.पोर्तुगीजांनी स्वतःसोबत आणलेली बटाटा, अननस, टोमॅटो अशी नवनवी पिकं इथे रुळायला, इथल्या स्वयंपाकात सामावून जायला कमीअधिक वेळ लागला ; पण, मिरचीने बाजी मारली. इथल्या मातीत ती जोमाने रुजली. स्वयंपाकघरांत तिच्याविना पान हालेना. आधी गोवा-महाराष्ट्र, नंतर संपूर्ण दक्षिण भारत तिने पादाक्रांत केला. खरंखोटं माहिती नाही पण, असं म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या युद्धमोहिमांमुळे उत्तर भारताला मिरचीशी तोंडओळख झाली. जेवणातल्या मिरचीमुळे मराठी सैन्य अधिक त्वेषाने लढू शकतं असा उत्तरेकडे समज होता... (पूर्वार्ध)(askwhy.meghana@gmail.com)

टॅग्स :foodअन्न