हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी मदत करेल 'संत्र्यांच्या सालींचा चहा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:39 IST2019-10-31T16:35:37+5:302019-10-31T16:39:16+5:30
सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. दिवसभर कडक उन्हामुळे हैराण होतं पण तेच सकाळी आणि संध्याकाळी गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे.

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी मदत करेल 'संत्र्यांच्या सालींचा चहा'
सध्या वातावरणात अनेक बदल होत आहेत. दिवसभर कडक उन्हामुळे हैराण होतं पण तेच सकाळी आणि संध्याकाळी गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. म्हणजेच, हिवाळा सुरू होत आहे. हिवाळ्यात जेवढी मजा सगळीकडे फिरायला येते तेवढीच भिती सर्दी-खोकल्याची असते. जर तुम्ही बदलणाऱ्या वातावरणात आणि येणाऱ्या हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्याचा विचार करत असाल तर ऑरेंज पील टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊया घरच्या घरी संत्र्याच्या सालींपासून चहा तयार करण्याची रेसिपी...
- ऑरेंज पील टी तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मुठभर संत्र्याच्या सालींची गरज असते. त्यासाठी तुम्ही ताज्या संत्र्यांच्या सालीची गरज असते. त्यासाठी ताजी संत्री सोलून त्याची साल काढून घ्यावी.
- आता जवळपास एक लीटर पाणी एका पॅनमध्ये गरम होण्यासाठी ठेवा. जेव्हा पाणी व्यवस्थित गरम होईल त्यावेळी यामध्ये संत्र्यांच्या साली एकत्र करा.
- चव आणि आरोग्यदायी करण्यासाठी या पाण्यामध्ये तुम्ही दालचिनीचा तुकडा एकत्र करू शकता.
- व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तयार मिश्रण जवळपास 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
- जवळपास 15 मिनिटांनी तयार चहामध्ये चवीनुसार, मध एकत्र करा आणि सर्व्ह करा संत्र्याच्या सालींचा चहा.