घरीच बनवा रवा डोसा ; अगदी हॉटेलमध्ये बनतो तसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 05:46 PM2020-02-06T17:46:33+5:302020-02-06T17:51:30+5:30

कुरकुरीत रवा डोसा तसा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण हॉटेलसारखा डोसा घरी बनत नसल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र मैदा न वापरता, घरच्या घरीही आणि तेही कमीत कमी वेळेत रवा डोसा बनवणे शक्य आहे. जाणून घ्या ही पाककृती. 

Make homemade Rava Dosa; Just like in a hotel | घरीच बनवा रवा डोसा ; अगदी हॉटेलमध्ये बनतो तसा 

घरीच बनवा रवा डोसा ; अगदी हॉटेलमध्ये बनतो तसा 

googlenewsNext

कुरकुरीत रवा डोसा तसा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण हॉटेलसारखा डोसा घरी बनत नसल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र मैदा न वापरता, घरच्या घरीही आणि तेही कमीत कमी वेळेत रवा डोसा बनवणे शक्य आहे. जाणून घ्या ही पाककृती. 

साहित्य :

२वाट्या बारीक रवा

१/२ वाटी तांदूळ पीठ 

२ मोठे चमचे मुगडाळ पीठ( बेसनाचे वापरले तरी चालेल) 

२ वाट्या ताक

  पाणी 

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या  

मीठ 

तेल 

कृती :

  •  २ वाट्या बारीक रवा,  १/२ वाटी तांदूळ पीठ आणि २ मोठे चमचे मुगडाळ पीठ ताकात साधारण१/२  तास भिजवून घ्या. 
  • अर्ध्या तासानंतर परत साधारण ३ ते ४ वाट्या पाणी टाका, रव्याच्या फुगण्यावर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते
  • आता त्यात  आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. 
  • मीठ चवीनुसार घाला. 
  • फ्राय पॅनवर मिश्रण पसरवून पातळ डोसा काढून घ्या. डोसा चिकटतो असे वाटल्यास सर्व बाजूंनी चमचाभर तेल टाका. 
  • तवा मध्यम तापला असतानाच डोसा टाकावा. 
  • नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा रवा डोसा.

Web Title: Make homemade Rava Dosa; Just like in a hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.