Shev Bhaji Recipe : १० मिनिटांत बनवा तेजतर्रार ढाबा स्टाईल शेवभाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 18:06 IST2020-01-28T18:02:05+5:302020-01-28T18:06:19+5:30
Shev Bhaji Recipe : ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार शेवभाजीची रेसिपी.

Shev Bhaji Recipe : १० मिनिटांत बनवा तेजतर्रार ढाबा स्टाईल शेवभाजी
पुणे :ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार शेवभाजीची रेसिपी.
साहित्य :
जाड शेव, एक वाटी
बारीक चिरलेला कांदा एक
बारीक चिरलेला टोमॅटो एक
आलं, लसूण पेस्ट (एक चमचा)
बेडगी मिरची लाल तिखट
अर्धा चमचा धने पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी
जिरे
मोहरी
हळद
तेल
मीठ
कृती :
- कढईत तेल तापवून त्या मोहरी आणि जिरे तडतडून घ्या.
- आता त्यात कांदा आणि टोमॅटो घालून परता.
- कांदा, टोमॅटो मऊ होण्यास सुरुवात झाल्यावर त्यात आलं, लसणाची पेस्ट घाला.
- सर्व साहित्य परतल्यावर त्यात हळद,लाल तिखट, निम्मी कोथिंबीर, धने पावडर आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत परता.
- मिक्सरच्या भांड्यात दोन लहान चमचे शेव फिरवून घ्या आणि ती मिश्रणात घाला.
- सगळयात शेवटी या मिश्रणात दोन वाट्या गरम पाणी गेला.
- गरम पाणी घातल्याने रश्श्याला लाल तर्री येईल.
- खायला देताना वाटीत शेव, त्यावर गरम रस्सा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- ही भाजी काही मिनिटात तयार होते. पोळी, भात, रोटी आणि ब्रेडसोबत खाता येते.
- पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा.