पोटाच्या समस्यांबरोबरच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 12:09 IST2019-12-14T11:54:49+5:302019-12-14T12:09:54+5:30
रोजचे व्यस्त जीवन जगत असताना आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होत असतं आणि नेहमी तेचतेच खाऊन कंटाळा आलेला असतो.

पोटाच्या समस्यांबरोबरच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ज्वारीची भाकरी, जाणून घ्या कशी....
(Image credit- pinterest.com)
रोजचे व्यस्त जीवन जगत असताना आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होत असतं आणि नेहमी तेचतेच खाऊन कंटाळा आलेला असतो. जर तुम्हाला काही वेगळं खावंस वाटत असेल तर ज्वारीची भाकरी नक्की ट्राय करा. ज्वारीची भाकरी ही शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चपाती खाऊन अनेकदा कंटाळा आलेला असतो. तर भाकरीसोबत झूणका किंवा एखादी झणझणीत भाजी बनवून तुम्ही मस्त जेवणाचा बेत करू शकता. चपाती तयार करण्याच्या तुलनेत भाकरी बनवायला कमी वेळ लागतो. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ज्वारीची भाकरी लाभदायक ठरते. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीच्या भाकरीचे फायदे काय आहेत.
(image credit-herbivorecucina.blogspot.com)
पोषक घटक
ज्वारीच्या भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिक आढळतात. ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करणं लाभदायक ठरेल.
वजन कमी करण्यासाठी
ज्वारीच्या भाकरीचे पीठ हे ग्लुटेन फ्री असतं. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे. त्यांनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. तसेच जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी
ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी ज्वारी पचायला हलकी असते. ज्वारीच्या भाकरीचे सेवनं केल्याने पाचनक्रिया सुरळीत राहते.
आजारांपासून बचाव
(Image credit- You-tube)
ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे रिसर्चमधून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे रोगांपासून बचाव करता येतो म्हणून ज्वारीच्या भाकरीचं सेवन करणं लाभदायक ठरतं.