शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरवर परिणामकारक ठरतात काबुली चणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:28 IST

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो.

हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हमखास छोले भटूरे किंवा छोले चावल ऑर्डर करतो. अनेकांच्या तर छोले म्हणजे जीव की प्राण. अनेकदा घरगुती समारंभ किंवा लग्नाच्या मेन्यूमध्येही काबुली चण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? काबुली चणे म्हणजे, ज्यांना आपण छोले किंवा पांढरे चणे असंही म्हणतो. हे फक्त खाण्यासाठीच चविष्ट नसतात तर ते शरीरासाठीही पौष्टिक ठरतात. काबुली चणे, प्रोटीनचा सर्वात उत्तम स्त्रोत आहेत. यामध्ये दुसऱ्या डाळींच्या तुलनेमध्ये 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन असतं. त्याचबरोबर अनेक शरीराच्या समस्यांपासून बचाव करण्याचं कामही हे चणे करतात...

एनिमियापासून बचाव 

काबुली चणे आयर्नचा एक उत्तम स्त्रोत आहेत. याच्या सेवनाने एनिमियाची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्स मुलांमध्ये रक्ताची कमतरता झाल्यास किंवा गरोदर महिला आणि ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांना चणे खाण्याचा सल्ला देतात. 

दातांच्या मजबुतीसाठी 

काबुली चण्यांमध्ये जवळपास 28 टक्के फॉस्फरस असतं. हे शरीरामध्ये नवीन पेशी तयार करण्याचं काम करतं. शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवून किडनीमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे किडणीच्या सुरक्षेसाठी चण्यांचं सेवन लाभकारी असू शकतं. याव्यतिरिक्त यामध्ये मीठ टाकून खाल्याने दात मजबूत होण्यासाठी मदत होते. यामध्ये डाइयूरेटिक गुणधर्म असतात. हे यूरिन प्रॉब्लेम्सपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. 

वजन कमी करण्यासाठी 

काबुली चणे फायबरचे उत्तम स्त्रोत आहेत. भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जेवणाच्या फार वेळानंतरही एनर्जी लेव्हल हाय ठेवण्यासाठी चणे मदत करतात. ज्यामुळे तुमचं वजन घटवण्यासाठी मदत करते. तसेच मोड आलेले काबुली चणे खाल्यानेही फायदा होतो. 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 

चणे शरीरामधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. तसेच आतड्यांमधील पित्तासोबत एकत्र होऊन रक्तातील वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. 

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी

हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करणाऱ्या रूग्णांसाठी चणे खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. चण्यांमध्ये असलेलं पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम शरीरातील ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. 

पाचन शक्ती वाढविण्यासाठी 

चणे पचनसंस्था आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं. चण्यामध्ये फीटो-न्यूट्रिएंट, उच्च प्रोटीन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं. जे बद्धकोष्ट, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून काम करतं. 

स्नायू बळकट करण्यासाठी

जिमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काबुली चणे अत्यंत फायदेशीर ठरतात. हे प्रोटीनचा मुख्य स्त्रोत आहेत. यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते. काबुली चणे सलाडमध्ये एकत्र करून खाल्याने शरीराला पौष्टिक आहार देण्यासाठी फायदा होतो. 

असा करा काबुली चण्यांचा आहारात समावेश :

तसं पाहायला गेल तर काबुली चणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही यामध्ये खूप मसाले आणि मिरची पावडर टाकून खाल्याने ते फायदेशीर ठरतं. चणे खाल्याने फायदा तेव्हाच होतो जेव्हा हे तुम्हा मसाल्यांशिवाय किंवा कमी मसाल्यांसोबत फक्त सलाड सोबत खाता.

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स