Watermelon Safety Tips : शरीराला गारवा मिळावा, शरीर हायड्रेट रहावं म्हणून उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. लालेलाल, थंड आणि भरपूर पाणी असणारं हे फळ सगळ्यांनाच आवडतं. कलिंगडाने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हेच फायदेशीर कलिंगड जीवही घेऊ शकतं याचा कुणी विचारही केला नसेल. मुंबई घडलेल्या घटनेमुळे लोकही आता कलिंगडाबाबत विचारात पडले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईच्या पायधुनीमध्ये फूड पॉयजनिंगमुळे एकाच परिवारातील चार लोकांचा जीव गेला. असं सांगण्यात आलं की, आधी या कुटुंबातील लोकांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर कलिंगड खाल्लं. ज्यानंतर काही तासांमध्येच त्यांना उलटी होऊ लागली आणि त्यांची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, कलिंगडात काही भेसळ किंवा घातक रसायन तर नव्हतं ना?
कलिंगड इंजेक्शन देऊन लाल केलं जातं?
नेहमीच ऐकायला मिळतं की, कलिंगड जास्त लाल दिसावं आणि अधिक गोड लागावं यासाठी त्यात इंजेक्शन लावलं जातं. पण प्रत्येक केसमध्ये असं होत नाही. असं असलं तरी बाजारात काही ठिकाणी भेसळ केल्याचं किंवा रसायन टाकल्याचं नाकारता येत नाही. अनेकदा कलिंगड लवकर पिकवण्यासाठी किंवा आकर्षक दिसण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. जे तब्येतीसाठी घातक ठरू शकतात. अशात चेक न करता फळ खाणं नुकसानकारक ठरू शकतं.
कसं चेक कराल?
कलिंगड खरेदी करताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहू शकता. सगळ्यात आधी तर कलिंगड कापल्यावर फार जास्त चमकदार लाल किंवा एकसारखं दिसेल तर वेळीच सावध व्हा. सोबतच जर त्यातून विचित्र वास येत असेल किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी लागत असेल तर ते खाणं टाळावं. काळजी घ्या की, कलिंगड नेहमीच स्वच्छ पाण्याने धुवावे. तसेच कापलेलं कलिंगड खरेदी करू नये, त्यात बॅक्टेरिया असण्याचा धोका असतो.
– जमिनीवर टेकलेला भाग क्रीम-पिवळा असेल तर कलिंगड नैसर्गिक पिकलेलं असतं. पांढरा डाग असेल तर कच्चं असू शकतं.
– हाताने हलकं ठोठावल्यावर खोल आणि पोकळ आवाज आला तर कलिंगड चांगलं असतं.
– आकाराच्या मानाने जड वाटलं तर त्यात पाणी आणि रस जास्त असतो.
– खूपच लाल, असमान रंग किंवा विचित्र पोकळ्या दिसल्या तर कृत्रिम पिकवलेलं असू शकतं.
– नैसर्गिक पिकलेल्या कलिंगडाला हलका गोडसर सुगंध येतो. केमिकलचा वास आला तर घेऊ नका.
सतर्क राहणंच मोठा बचाव
एक्सपर्ट सांगतात की, फूड पॉयजनिंगच्या केसेस उन्हाळ्यात खूप वाढतात. कारण या दिवसांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे नेहमी ताजी आणि स्वच्छ फळंच खावीत. जर एखादं फळ खाल्ल्यानंतर उलटी, पोटदुखी किंवा चक्कर आल्यासारखं काही वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. मुंबईत घडलेली घटना या गोष्टीचा इशारा आहे की, खाण्या-पिण्याच्या गोष्टींबाबत थोडेही बेजबाबदार वागाल तर जीवालाही धोका होऊ शकतो.
Web Summary : Worried about injected watermelons? Check for overly red color, strange smells, or uneven textures. Choose heavy, fragrant melons with yellow spots. Freshness is key to safety.
Web Summary : कलिंगड में इंजेक्शन की आशंका? अधिक लाल रंग, अजीब गंध या असमान बनावट देखें। पीले धब्बे वाले भारी, सुगंधित तरबूज चुनें। ताजगी सुरक्षा की कुंजी है।