शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

आवडीनं खाल असा झणझणीत कोबीचा झुणका.....नक्की करून बघा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:13 IST

हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात दिसतात. पण सारख्या भाज्या खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो.

(image credit-twitter.com)

हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात दिसतात. पण सारख्या भाज्या खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्याच भाज्यांपासुन काहीतरी नविन केल्यास घरातील मंडळी आवडीने खातील. त्यापैकीच एक कोबीची भाजी ही पारंपारीक पध्दतीने घरात तयार केली गेली तर बऱ्याचवेळा लहान मुलचं नाही तर मोठी माणंस सुध्दा नाक मुरडतात. त्याच कोबीपासून तयार करण्यात आलेला झुणका तयार केला तर घरचे लोक बोट चाखत राहतील. तर जाणून घेऊया कोबीचा झुणका  कसा तयार करतात.

साहित्य : १ छोट्या आकाराचा कोबी, ३ टेबलस्पून तेल, दोन हिरव्या मिरच्या, लाल तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, साखर, हिंग, मोहरी आणि जिरं, ३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ.

कृती

(Image credit-archnaskitchen.com)

कोबी पातळ उभा चिरून निथळत ठेवावा. 

मिरच्यांचे मोठे तुकडे करून घ्यावे. तापलेल्या कढईत तेल घालावं. 

तेल तापले की त्यात मोहारी, जिरं, हिंग, हळद आणि मिरची एकापाठोपाठ एक घालावे. त्यावर निथळलेला कोबी घालून परतावं. 

मग लाल तिखट घालून परतून झाकण घालावं आणि एक वाफ येऊ द्यावी.

 त्यात मीठ, साखर घालून भाजी शिजवून घ्यावी. शिजताना डाळीचं पीठ पेरावं आणि एकदा परतून मस्त वाफ येऊ द्यावी.

आच बंद करून पाच मिनिटं झाकण काढताच भाजी मुरू द्यावी.

कोबीचा झुणका तयार आहे. गरम झुणका, भाकरी, चटणी बरोबर खावा.

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती