शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Kothimbir Vadi Recipe : कुरकुरीत, खमंग कोथिंबीर वडी रेसिपी, एकदा खाल तर खातच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:31 PM

Kothimbir Vadi Recipe : कोथिंबीरवडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही सीजन मध्ये घराघरांत आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी खाल्ली जाते.

(image credit-.memaharashtrian)

कोथिंबीर वडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही सीजन मध्ये घराघरांत आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी खाल्ली जाते. कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी महिला वेगवेगळ्या पध्दती वापरतात. कोथिंबीरी ची स्वतःची अशी एक वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीरमध्ये अनेक औषधी गुण असतात. आपल्याला फक्त जेवणापुरतंच कोथिंबीर माहीत असते. कोथिंबीरीमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. तर मगं जाणून घ्या  कोथिंबीर वडी कशी खमंग तयार होईल.

साहीत्य-१ कप बेसन१/४ कप तांदळाचे पीठ४ हिरवी मिरची१ लसूण१चमचा जिरे१चमचा हळद१/२ चमचा लाल मिरची पावडरमीठ चवीनुसारतळण्यासाठी तेल१ टेबल स्पून तीळ

(image credit-Madhurasrecipe)

 

कृती-कोथिंबीर एक जुडी घ्यावी. व्यवस्थित साफ करुन बारिक चिरुन पाण्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.त्यानंतर कोणत्याही सुती कापडावर पंख्याखाली पसरुन ठेवा.त्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको.आता साहित्य काय लागेल ते पाहुया.एक जुडी कोथिंबीरीसाठी एक कप बेसन, पाव कप तांदळाचे पीठ घ्यावे. तांदळाच्या पीठामुळे वडीला कुरकुरीतपणा येतो.त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.एक चमचा जिरे, एक चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर,मीठ चवीनुसार घ्यावं. आता कोथिंबीरीमध्ये वरील पदार्थ  टाकून पीठ चांगले मिसळून त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे.जास्त पाणी टाकू नये. कोथिंबीरी मध्ये मीठ असल्याने त्याला नंतर पाणी सुटतेपीठ पातळ झाले तर वडी कुरकुरीत होणार नाहीत. त्यात थोडे तेल घालून पीठ व्यवस्थितपणे मळुन घ्यावे. पीठात  तेल  घातल्याने हाताला चिकटणार नाही.नंतर त्याचे रोल्स करून ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्यावी. त्या चाळणीला तेल लावून घ्यावे. त्यामुळे ते चाळणीला चिकटणार नाहीत. नंतर कढईत पाणी गरम करून त्यावर ही चाळण झाकून १५ मिनिटांसाठी वाफवायला ठेवावी.१५ मिनिटांनी झाकण काढून थंड होण्यासाठी ठेवावे.थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर वड्या चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या.त्यानंतर प्लेट मध्ये टिश्यू पेपरवर वड्या काढून घ्याव्यात असं केल्याने जास्तीचे तेल निघून जाईल.यामध्ये लाल मिरची पावडर टाकल्याने त्याचा रंग लालसर होईल. तुम्ही फक्त लसूण मिरची पेस्ट सुध्दा टाकू शकता. ही वडी इतकी चविष्ट लागते ती अशी खाल्ली तरीही खुप छान लागते.तुम्ही ही वडी सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता. 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती