मंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:20 IST2021-05-11T15:07:09+5:302021-05-11T15:20:31+5:30
बाजारात कलिंगड खरेदी करायला जाताय. पण चांगल कलिंगड निवडायचं कसं? या टीप्स वाचून चटकन ओळखाल कलिंगड कसं चांगलं निघू शकत...

मंडळी कलिंगड खरेदी करताय...कसा निवडाल गोड, रसदार कलिंगड?
उन्हाळ्यात उपलब्ध असणारं लाल चुटुक कलिंगड म्हणजे सर्वांचा विकपॉईंट. त्यातही कलिंगड खरेदी करतानाची मजाही औरच असते. या फळात पाण्याचे प्रमाण फार जास्त असते. तसेच विविध जीवनसत्वांनीयुक्त हे फळ अत्यंत गुणकारी असते.
जेव्हा तुम्ही बाजारात कलिंगड खरेदी करायला जाता तेव्हा चांगले, गोड, रसदार कलिंगड कसे आहे हे कसे निवडाल? आम्ही तुम्हाला देत आहोत कलिंगड निवडण्याच्या टीप्स...
पिवळे डाग असलेले कलिंगड
साधारणत: असा समज असतो की पिवळे डाग असलेला कलिंगड कच्चा तरी असतो किंवा बेचव असतो. हा समज चुकीचा आहे. चांगलं हिरवेगार दिसणारं कलिंगडसुद्धा बेचव निघु शकत. त्यामुळे कलिंगडावर काही प्रमाणात पिवळे डाग असले तरी त्याची चव गोड असू शकते.
वजनावरूनही कल्पना येते
कलिंगड खरेदी करताना ते हातात उचलून पहावं. जे कलिंगड वजनानं जास्त असेल तर गोड लागतं. तेच जर कलिंगड वजनानं कमी असलं तर ते बेचव असू शकतं.
हलकेच ठोकून पाहा
बाजारात गेल्यावर कलिंगड घेताना हलक्या हातांनी वाजवून बघा. जर टक-टक असा आवाज आला की समजा कलिंगड चवीला गोड आहे. जर असा आवाज नाही आला तर समजा हे कलिंगड चवीला चांगले नाही.
कलिंगडाचा मधला भाग नसणे
कलिंगड कापल्यावर त्याचा मधला भाग नसेल तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही. उलट कलिंगडामध्ये मधला भाग नसेल तर कलिंगड चवीला जास्त गोड असते.
पाण्यात घालून पहा
कलिंगड कापल्यावर जर जास्तीच लालचुटुक दिसत असेल तर संशय येतोच. अशावेळी खरेदी करतानाच दुकानदाराला कलिंगडाचा छोटासा तुकडा कापून देण्यास सांगावे. हा तुकडा पाण्यात टाकल्यावर लाल होत असेल तर समजून जावे की कलिंगड पिकवताना लाल रंग वाढवण्यासाठी रसायनांचा प्रयोग केलेला आहे.