home-made mawa cake recipe | लई भारी, घरच्या घरी बनवा मावा केक

लई भारी, घरच्या घरी बनवा मावा केक

पुणे :केक करण्यासाठी खूप साहित्य किंवा ओव्हन लागतेच असे नाही. अगदी कमी साहित्यात आणि न बिघडण्याच्या भीतीने मावा केक बनवणे शक्य आहे. वाचा ही पाककृती. 

साहित्य :
दोन वाट्या मैदा,

एक चमचा बेकिंग पावडर, 

अर्धा चमचा बेकिंग सोडा

एक वाटी पीठी साखर  

अर्धी वाटी लोणी   

वेलची पावडर, 

जायफळ पूड, 

सुका मेव्याचे काप, 

टुटीफ्रुटी, 

रोज/व्हँनिला ईसेन्स   

  दूध

 कृती :

  • दोन वाट्या मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावे, 
  • पाऊण वाटी पीठी साखर व अर्धी वाटी लोणी चांगलं फेटून घ्यावे (फूलून जवळपास डबल होईपर्यंत) नंतर यात वेलची पावडर, जायफळ पूड, सुका मेव्याचे काप, टुटीफ्रुटी, रोज/व्हँनिला ईसेन्स व चाळलेला मैदा एकत्र करावा व फेटून घ्यावे 
  • हे मिश्रण थोडं घट्टसरच ठेवावं त्यानुसार थोडं दूध घालून फेटून घ्यावे .
  •  कुकरची शिट्टी व रिंग काढून त्यात अर्धी वाटी मीठ पसरवून व एखादी वाटी त्यात पालथी ठेऊन आधी झाकण लावून गरम करून घ्यावा
  • केकचं तयार मिश्रण ग्रीस केलेल्या व मैदा भुरभुरवलेल्या भांड्यात घालून आवडीनुसार वरून सुकामेव्याचे काप टाकून हे भांडे गरम कुकर मध्ये ठेवावे
  • कुकरचे झाकण लावून ४५/५० मिनीटे मध्यम आचेवर बेक करायला ठेवावे
  • थंड झाल्यावर आवडीनुसार कापून चहासोबत सर्व्ह .मावा केक 

Web Title: home-made mawa cake recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.