शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तुम्ही आवडीने खात असलेली आइस्क्रिम भारतात कुठून आली माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 13:07 IST

उन्हाळ्यातील प्रखर किरणांपासून शरीराला आराम देण्याचं काम आइस्क्रिम करते. पण फक्त उन्हाळ्यातच नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आवर्जुन आइस्क्रिम खाणाराही एक गट आहे.

उन्हाळ्यातील प्रखर किरणांपासून शरीराला आराम देण्याचं काम आइस्क्रिम करते. पण फक्त उन्हाळ्यातच नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आवर्जुन आइस्क्रिम खाणाराही एक गट आहे. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आइस्क्रिम्स उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही आइस्क्रिम भारतात आली कशी? तसेच या थंडगार आइस्क्रिमचा इतिहास नक्की काय आहे? विश्वास ठेवा जेवढी भारी आइस्क्रिमची टेस्ट आहे. तेवढाच भारी तिचा इतिहासही आहे. 

आइस्क्रिमचा शोधाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, सर्वात आधी इसवीसनपूर्व 3000 दरम्यान चीनमध्ये आइस्क्रिम तयार करण्यात आलं होतं. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, Marco Polo जे एक इटालियन व्यापारी होते त्यांनी सर्वात आदी इटलीमध्ये आइस्क्रिम तयार केलं होतं. पण या दोन्ही थिअरीमध्ये इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. अनेक इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की, सर्वात आधी आइस्क्रिमचा उल्लेख इसवीसनपूर्व 500 दरम्यान इराणच्या अचमेनिद साम्राज्यामध्ये मिळतो. 

त्यांनी सांगितल्यानुसार, इसवीसनपूर्व 400 मध्ये फारसि लोकांनी बर्फाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उपयोग करून आइस्क्रिम तयार करण्यास सुरुवात केली. इराणमधील लोक थंडीमध्ये पडणारा बर्फ आपल्या आइल हाउसमध्ये एकत्र करून ठेवत असतं. जे 'यखचल' या नावाने ओळखलं जात असे. फारसी भाषेत 'यख'चा अर्थ आहे 'बर्फ' आणि 'चल'चा अर्थ आहे 'खड्डा'. हा बर्फ या व्यक्ती वर्षभर वापरत असतं. या बर्फामध्ये द्राक्षं, केशर, गुलाब पाणी इत्यादी पदार्थ एकत्र करून त्या आइसक्रिम तयार करत असत. Bastani Sonnati ही त्या काळीतील अत्यंत प्रसिद्ध आइस्क्रिम होती. 

hindi.scoopwhoop.com ने दिलेल्या माहितीनुसार, इसवीसनपूर्व 200 मध्ये चीनमधील लोक आइस्क्रिम तयार करण्यासाठी दूध आणि तांदूळ उकळून बर्फामध्ये ठेवत असतं. इसवीसन 37 ते 68 दरम्यान रोमचे राजा नीरो पर्वतांवरून बर्फ फळांच्या रसामध्ये एकत्र करून खात असत. 

Marco Polo ने 1254-1324 दरम्यान चीनमधून आइस्क्रिम आणून इटलीमध्ये इंट्रोड्यूस केली होती. ते आपल्या चीनच्या दौऱ्यामध्ये आइस्क्रिम तयार करायला शिकले होते. त्यानंतर आइस्क्रिम प्रान्समध्ये पोहोचली आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये. 17व्या शतकामध्ये आइस्क्रिम इंग्लंडमध्ये पोहोचली. असं सांगितलं जातं की, राजा Charles I यांनी आपल्या शेफला आइसक्रीमची रेसिपी गुपित ठेवण्यासाठी सांगितले होते. 

दक्षिण आशियामध्ये आइस्क्रिमचं आगमन मुघलांसोबत झालं. मुघल सम्राटांनी 16व्या शतकामध्ये हिंदुकुश पर्वतरांगांमधून बर्फ आणण्यासाठी घोडेस्वारांना पाठवत असत. तेव्हा हे दिल्लीच्या शाही दरबारामध्ये फळांचं सरबत म्हणून दिलं जात असे. 

आपण जी कुल्फी चवीने खातो. तीचा शोधही मुघल काळात 16व्या शतकामध्ये लागला होता. असं सांगितलं जातं की, भारतीय लोकांना हा पदार्थ तयार करण्याची प्रेरणा Bastani Sonnati या पदार्थांपासून मिळाली होती. 

19व्या शतकामध्ये अमेरिकेतील Evanston शहरामध्ये आइस्क्रिम सोड्यावर बॅन लावण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांनी आइस्क्रिममध्ये सोड्याऐवजी सिरपचा वापर करण्यास सुरुवात केली आणि अशाप्रकारे Ice Cream Sundaes चा शोध लागला. 

असा आहे आइस्क्रिमचा रोचक इतिहास. त्यावेळी केवळ बर्फामध्ये फ्लेवर्स एकत्र करून खाल्ली जाणाऱ्या आइस्क्रिमचं रूप सध्या प्रचंड बदललेलं दिसतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या रूपात आइस्क्रिम उपलब्ध आहे. खवय्यांसाठी तसेच आइस्क्रिम लव्हर्सच्या आवडीनुसार आइस्क्रिम कस्टमाइज करूनही घेता येते. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यhistoryइतिहास