शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

हिरव्या वाटाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:22 IST

बाजारामध्ये हिरव्या वाटाण्यांची आवाक् पाहायला मिळते. वाटाण्यांचा फक्त भाजीतच नाही तर पुलाव, पोहे, पराठे, पुऱ्या यांसारख्या इतर अनेक पदार्थांमध्येही वाटाण्याचा समावेश करण्यात येतो.

बाजारामध्ये हिरव्या वाटाण्यांची आवाक् पाहायला मिळते. वाटाण्यांचा फक्त भाजीतच नाही तर पुलाव, पोहे, पराठे, पुऱ्या यांसारख्या इतर अनेक पदार्थांमध्येही वाटाण्याचा समावेश करण्यात येतो. वाटाणा आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. एवढचं नाहीतर आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही वाटाणे खाणं फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला वाटाण्यांचे शरीरासोबतच, सौंदर्यासाठी असणारे फायदे सांगणार आहोत 

वाटाण्याचे आरोग्यदायी फायदे... 

डोळ्यांसाठी फायदेशीर... 

वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन ए, अल्फा-कॅरोटिन आणि बीटा-कॅरोटिन असतं. जे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर यामुळे ड्राय आय सिंड्रोम सारख्या समस्याही दूर होतात. 

हेल्दी हार्ट

वाटाणा शरीरामधील ट्रायग्लिसराइड्सचा स्तर कमी करून रक्तातील सकोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतं. यामुळे हृदयाच्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. 

तल्लख बुद्धीसाठी 

हिरवा वाटाणा खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याव्यतिरिक्त तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. शक्य असल्यास तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. 

हाडांच्या मजबुतीसाठी 

वाटाण्यामध्ये असलेलं प्रोटीन हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतं. ज्यामुळे वाढत्या वयात होणाऱ्या ओस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी 

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज मुठभर वाटाणे नक्की खा. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. जे भूक नियंत्रणात ठेवण्यासोबतच फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. 

कॅन्सरपासून करा बचाव... 

अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टी इंफ्लेमेटरी मुबलक प्रमाणात असल्यामुळे याचं सेवन शरीरात कॅन्सर सेल्स वाढविण्यापासून थांबवतात. यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करू शकता. 

डायबिटीससाठी फायदेशीर... 

वाटाण्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळून येतं. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे डायबिटीसपासून सुटका होण्यास मदत होते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी... 

सर्व आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत असणारा वाटाणा शरीराची रोगप्रितिका शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतो. यामुळे आजारांपासून लढण्यासाठी शरीराला ताकद मिळते. त्याचरोबर हे अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिवाणुंना अॅक्टिव ठेवतात. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही मदत करते. 

वाटाणा आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया वाटाण्याचे सौंदर्य खुलवण्यासाठीचे फायदे... 

त्वचा उजळवण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठी... 

वाटाण्याचा मास्क चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. त्यासाठी वाटाणा पाण्यामध्ये उकळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्याव लावा आणि त्यानंतर स्क्रब करत काढून टाका. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा असं केल्याने अनेक फायदे होतील. 

सुरकुत्यांवर फायदेशीर... 

वाटाणा आणि संत्र्याची साल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते आणि सुरकुत्याही कमी होतात. 

ग्लोइंग त्वचेसाठी वाटाण्याचा मास्क... 

2 टिप्सून उकडून स्मॅश केलेले वाटाणे, 1 चमचा मध, एक चमचा दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा कोरफडीचं जेल आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करा. आता हे चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर पाण्याने धुवून टाका. 

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी... 

वाटाण्यामध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट गुण चेहऱ्यावरील कोलेजन आणि इलास्टिनच्या लेअरचं रक्षण करतात. यामुळे त्वचा सूर्यकिरणांपासून डॅमेज होत नाही. 

चमकदार केसांसाठी 

वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन-बी-6 आणि बी-12 आढळून येतं. जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने केसांची ग्रोथ होते आणि केस मजबुत होण्यासही मदत होते. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स