शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

Chocolate Peda: बाप्पासाठी तयार करा चॉकलेट आणि बदामाचे पेढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 13:12 IST

दररोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता.

दररोज बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोणते खास पदार्थ तयार करायचे? या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. जाणून घेऊयात चॉकलेट बदाम पेढे तयार करण्याची रेसिपी...

साहित्य :

  • बदाम 250 ग्रॅम (भिजवून घ्या)
  • तूप (आवश्यकतेनुसार)
  • कोको पावडर 2 मोठे चमचे
  • कंडेंस्ड मिल्क 100 ग्रॅम
  • बारिक कापलेले बदाम 
  • साखर आवश्यकतेनुसार

 

कृती :

- चॉकलेट बदामाचे पेढे तयार करण्यासाठी सर्वात आधी बदामाची साल काढून बारिक करून घ्या. एक कढई मध्यम आचेवर ठेवा त्यामध्ये तूप टाका. तूप गरम होईपर्यंत त्यामध्ये कंडेस्ड मिल्क आणि कोको पावडर टाकून मिक्स करा. फक्त हे एकत्र करताना त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत ही काळजी घ्या.

- तयार मिश्रणामध्ये बदामाची पेस्ट टाका आणि एकत्र करून घ्या. 

- कढईमध्ये तूप गरम झाल्यावर तयार मिश्रण थोडं शिजवून घ्या. 

- त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यास तुम्ही साखर टाकू शकता. 

- मिश्रण शिजल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्या. 

- थंड झाल्यानंतर हाताने पेढ्यांप्रमाणे छोटे गोळे वळून घ्या. 

- त्यावर बारिक कापलेले बदाम लावा, पेढे तयार आहेत. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवReceipeपाककृती