World Food Day : कापलेलं सफरचंद काळं पडू नये म्हणून खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 11:41 IST2018-10-16T11:04:47+5:302018-10-16T11:41:37+5:30
फळ कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आलेले अनेकजण असतील. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात.

World Food Day : कापलेलं सफरचंद काळं पडू नये म्हणून खास उपाय!
फळ कापल्यानंतर काही वेळाने ते काळं पडल्याचा अनुभव आलेले अनेकजण असतील. कापलेल्या फळांचां बदलेला रंग किंवा ते काळे पडल्याने ते खाण्यासही अनेकजण टाळतात. तुम्ही कितीही चांगल्या क्वॉलिटीचा सफरचंद विकत आणला तरी कापल्यानंतर काही वेळाने त्याला भुरका रंग येऊ लागतो.
याचा कारण म्हणजे सफरचंद कापल्यावर त्याचा संपर्क ऑक्सिजनसोबत येतो आणि त्यातून एन्जाइम रिलीज होतात. आणि सफरचंद ऑक्सिफाइड होऊ लागतात. अशात आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही सफरचंद काळा पडण्यापासून बचाव करु शकता.
आंबट ज्यूसने काळा नाही पडणार सफरचंद
सायट्रिक अॅसिड ऑक्सिडेशनची प्रक्रिया बंद करतं ज्यामुळे कापलेली फळे काळे पडू लागतात. अशात तुम्ही कापलेल्या सफरचंदवर लिंबाचा रस किंवा संत्र्याचा रस टाकू शकता. याने फळ काळं पडणार नाही. किंवा हवं असेल तर तुम्ही सफरचंद आबंट फळांच्या रसात बुडवून ठेवू शकता. पण याने सफरचंदच्या टेस्टमध्ये थोडा फरक पडेल.
मिठ आणि पाणी
सोडियम क्लोराईड आणखी एक केमिकल आहे जे ऑक्सिडेशनची प्रक्रिया रोखण्यास काम करतं. अशात तुम्हाला हवं असेल तर कापलेला सफरचंदला मिठाच्या पाण्यात काही वेळासाठी टाकून ठेवा. या पाण्यात सफरचंद चांगल्याप्रकारे भिजल्यावर त्याला काढून साध्या पाण्याने धुवून घ्या.
रबर बॅंडची ट्रिक
जर तुम्ही सफरचंद किंवा कोणतही फळ कापून लगेच खाणार नसाल तर यावर तुम्ही रबर बॅंड ट्रिक वापरु शकता. यासाठी तुम्हाला सफरचंदच्या फोडी कराव्या लागतील आणि त्यांच्या चारही बाजूंनी टाईट रबर बॅंड बांधा जेणेकरुन कापलेल्या फोडींना हवा लागणार नाही. असे केल्याने ऑक्सिडेशनची प्रक्रिया हळुवार होईल आणि तुमचं फळ काळंही पडणार नाही.