शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कसे ओळखाल लसूण चायनीज आहे? वाचा गावरान आणि चायनीज लसणातील फरक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:57 IST

Chinese and Desi Garlic: लोकांना गावरान लसूण आणि चायनीज लसूण यात फरक कसा करावा हे कळत नाहीये. अशात यात काय फरक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Chinese and Desi Garlic: सध्या बाजारात चायनीज लसूण मिळत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात लोकांना गावरान लसूण आणि चायनीज लसूण यात फरक कसा करावा हे कळत नाहीये. अशात यात काय फरक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोठा गाठा, स्वच्छ आणि शुभ्र दिसणारा व सोबत स्वस्तात मिळणारा लसूण तुम्ही घरी आणून वापराल तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. कारण हा लसूण चायनीज आहे. जो देशातील लखनौसहीत अनेक शहरांमध्ये विकला जात आहे. हा लसूण २०१४ पासून बॅन आहे. 

एक महत्वाचा मुद्दा असाही आहे की, जास्तीत जास्त भाजी विक्रेत्यांना चायनीज लसणाची माहिती नाही. ते केवळ स्वस्त मिळतो म्हणून तो खरेदी करतात आणि विकतात. 

चायनीज लसणाची ओळख

चायनीज लसूण दिसायला टवटवीत दिसतो. या लसणाच्या कळ्या गावरान लसणापेक्षा जाड असतात. आणखी एक फरक म्हणजे या लसणाला जास्त गंध नसतो. याचं कारण यात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. या लसणामध्ये सिथेंटिक सुद्धा मिक्स केलं जातं. तसेच यात झिंक आणि आर्सेनिकचा वापर केला जातो. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. चायनीज लसणामध्ये चिकटपणाही कमी असतो. 

डुप्लिकेट लसणाची ओळख

बाजारात आजकाल डुप्लिकेट लसूणही विकला जात आहे. यात नुकसानकारक केमिकल्सचा वापर केला जातो. डुप्लिकेट लसणाचं उत्पादन घेण्यासाठी लेड, मेटल आणि क्लोरीनचा वापर केला जातो. अशा लसणाची ओळख पटवण्यासाठी लसणाची गाठ पलटवून बघा. याच्या खालच्या भागावर लसूण पूर्णपणे पांढरा दिसतो आणि त्यावर कोणताही ब्राउन डाग नसतो. अशात हा लसूण डुप्लिकेट असतो. 

गावरान लसणाची ओळख

गावरान लसूण हा आकाराने लहान असतो तर चायनीज लसूण आकाराने मोठा, टपोरा असतो. गावरान लसणामध्ये एक हलकीशी निळसर, जांभळट रंगाची छटा असते. लसूण हातात घेतल्यावर ज्याला सुवास येईल, तो लसूण गावरान आहे. लसणाच्या एका बाजुला मुळं असतात. ज्या लसूणाची मुळं काळी किंवा गडद चॉकलेटी रंगाची असतात, तो लसूण खरेदी करावा. गावरान लसणावर बरेच डाग असतात. त्यांची साल पूर्णपणे पांढरी नसते. तसेच गावरान लसणाचा गंध अधिक येतो. तसेच यात चिकटपणाही जास्त असतो. तसेच चायनीज लसूण हा लवकर सोलला जातो. तर गावरान लसूण सोलण्यासाठी जास्त वेळ लागतो.

टॅग्स :foodअन्नSocial Viralसोशल व्हायरल