'डेअरी फॅट्स' आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात की नाही?; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:59 IST2019-03-29T18:55:56+5:302019-03-29T18:59:25+5:30
फिटनेसवर लक्ष देणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो की, त्यांना डेअरी फॅट्स म्हणजेच, दूधापासून तयार करण्यात आलेले फॅट्सचा आहारात समावेश करावा की, नाही?

'डेअरी फॅट्स' आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात की नाही?; जाणून घ्या
फिटनेसवर लक्ष देणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो की, त्यांना डेअरी फॅट्स म्हणजेच, दूधापासून तयार करण्यात आलेले फॅट्सचा आहारात समावेश करावा की, नाही? अनेकांना दूधाचे पदार्थ आणि त्यातील पौष्टिक घटक ग्रहण करण्याची इच्छा असते. परंतु या पदार्थांचे अधिक सेवनाने वजन वाढू शकतं. तसेच याबाबत एक प्रश्नही उपस्थित करण्यात येतो की, खरचं यामध्ये असणारे फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात की नाही.
डेअरी फॅट्स म्हणजे काय?
डेअरी फॅट्स म्हणजेच फुल क्रिम दूध, ज्यामध्ये मलईच्या स्वरूपात फॅट्स असतात. याचबरोबर दूधापासून तयार करण्यात आलेली इतर उत्पादनं म्हणजे, दही, पनीर, लोणी इत्यादी पदार्थांमध्येही डेअरी फॅट्स असतात.
काय म्हणतात विशेषज्ज्ञ?
दे हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाधिक लोकांना ही चिंता असते की, डेअरी प्रोडक्ट्समधील हे फॅट्स हृदयासाठी घातक ठरतील. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, शुद्ध दुधापासून तयार केलेले पनीर, लोणी, तूप यांसारख्या पदार्थांचं सेवन केल्यास हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते. एका नव्या संशोधनामध्ये दूध किंवा दूधापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांमधील फॅट्स आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये काही संबंध आढळून आला नाही.
काय सांगतं संशोधन?
डेअरी फॅट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासून पाहण्यासाठी एक सखोल संशोधन करण्यात आलं. यामध्ये सहभागी असणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, आरोग्याला नुकसान पोहोचवण्याऐवजी डेअरी प्रोडक्ट्समध्ये असणारे फॅट्स गंभीर हृदय आघातापासून बचाव करण्याच काम करतं.
अमेरिका यूनिवर्सिटी ऑफ टेक्ससचे सहाय्यक प्राध्यापक मार्सिया ओटो यांनी सांगितले की, आमचं संशोधन फक्त या गोष्टीचं समर्थन करत नाही तर या गोषटीला दुजोराही देत आहे. डेअरी फॅट वयोवृद्धांमध्ये हृदयाचे आजार किंवा अकाली मृत्यू येणाचा धोका वाढवत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही त्याबाबत कोणताही दावा करत नाही.