हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 11:55 AM2019-11-03T11:55:33+5:302019-11-03T11:55:46+5:30

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो.

Benefits of eating ginger garlic pickle in winter season | हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

googlenewsNext

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो. प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही लसणाचं सेवन गुणकारी ठरतं. आलं आणि लसूण एक नैसर्गिक अॅन्टीसेप्टिक आहे.

आलं आणि लसणाच्या सेवनामुळे अनेक रोग दूर राहतात. लसूण आणि आल्यामध्ये बिटा कॅरोटीनही आढळून येतं. शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी लसूण आणि आल्याचं सेवन अत्यंत फायदेशीर ठरतं. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही आलं-लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. अशातच दररोज आलं आणि लसणाचं लोणचं डाएटमध्ये समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं. आज आम्ही आलं-लसणाच्या लोणच्याच्या फायद्यांसोबतच ते तायर करण्याची योग्य पद्धतही सांगणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर... 

आलं-लसणाचं लोणचं तयार करण्यासाठी साहित्य : 

  • 1 किलो सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
  • अर्धा किलो आलं 
  • 50 ग्रॅम वाटलेली मोहरी 
  • 50 ग्रॅम बडिशोप 
  • 20 ग्रॅम हळदीची पावडर 
  • 30 ग्रॅम 
  • एक चमचा ओवा 
  • मीठ चवीनुसार 
  • 40 ग्रॅम मिरची पावडर 
  • अर्धा लीटर मोहरीचं तेल 

 

आलं आणि लसणाचं लोणचं तयार करण्याची कृती : 

- लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घ्या. आल्याचीही साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावे. दोन्ही उन्हामध्ये कमीत कमी 2 तासांसाठ सुकवून घ्या. 
- एका कढईमध्ये बडिशोप, अर्धा लीटर मोहरीचं तेल एकत्र करून परतून घ्या. 
- तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं, मिरची, हळद आणि मीठ व्यवस्थित एकत्र करा. 
- आलं आणि लसणाचं लोणचं तयार आहे. एखाद्या हवाबंद डब्यात ठेवून द्या. 
- लोणचं काच किंवा मातीच्या भांड्यात ठेवू शकता. 
- लोणचं व्यवस्थित एकत्र करा आणि दररोज दोन तासांसाठी उन्हात ठेवा. 
- तयार लोणचं तुम्ही 4 किंवा 5 दिवसांनंतर खाऊ शकता. 

लसूण आणि आल्याचं लोणचं खाण्याचे फायदे : 

- दररोज या लोणच्याचं सेवन केल्याने हाडं मजबुत होतात. तसेच आजारांपासूनही बचाव होतो. सांधेदुखी आणि सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. 
- डायबिटीसच्या रूग्णांसाठी आलं-लसणाचं लोणचं अत्यंत फायदेशीर ठरतं. 
- थंडीत ब्लड सर्क्युलेशन उत्तम ठेवण्यासाठी आलं-लसणाचं लोणचं अत्यंत फायदेशीर ठरतं. 
- आलं लसणाचं लोणचं हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. 
- जर तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येने हैराण असाल तर आलं-लसणाचं लोणचं फायदेशीर ठरेल. 
- दररोज डाएटमध्ये आलं-लसणाचं लोणचं खाल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Benefits of eating ginger garlic pickle in winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.