Ashadhi Ekadashi2018 : झणझणीत उपवासाची मिसळ, एकदा करून तर बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 08:02 PM2018-07-21T20:02:33+5:302018-07-22T20:08:58+5:30

ही मिसळ सोपी तर आहेच पण उरलेल्या खिचडीला वेगळं रूपही देते. तेव्हा यंदाच्या आषाढीला उपवासाची मिसळ व्हायलाच हवी. 

Ashadhi Ekadashi2018: try once Upavasachi Misal | Ashadhi Ekadashi2018 : झणझणीत उपवासाची मिसळ, एकदा करून तर बघा !

Ashadhi Ekadashi2018 : झणझणीत उपवासाची मिसळ, एकदा करून तर बघा !

googlenewsNext

पुणे : उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वेफर्स आणि फळं खाण्याची संकल्पना आता मागे पडत असून त्यातही वेगवेगळ्या रेसिपी करून बघितल्या जातात. उपवासाची इडली, आप्पे, डोसे तर केले जातातच पण पुण्यात झणझणीत उपवासाची मिसळही मिळते. तोंडाला चव आणणारी ही मिसळ तुम्हीही घरी करून बघून शकता. 

साहित्य :

  • साबुदाण्याची खिचडी 
  • बटाट्याचे उकडलेले काप, भाजी, किस किंवा खिचडीत बटाटे असतील यापैकी काहीही नाही घेतलं तरी चालेल. 
  • दही 
  • मिरची, जिरं आणि मिठाचा मिक्सरमध्ये फिरवलेला ठेचा आवडीनुसार 
  • बटाट्याची शेव किंवा वेफर्स आवडीनुसार 
  • साबुदाणा तळून केलेला नायलॉन चिवडा 
  • खारे किंवा तेलात तळलेले शेंगदाणे 
  • बारीक चिरलेली काकडी 
  • शेंगदाण्याची आमटी 
  • मीठ 
  • साखर 
  • लिंबू 
  • आवडत असल्यास डाळिंबाचे दाणे

शेंगदाणा आमटी कृती : भाजलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून त्यात जिरे तडतडवून घ्या. त्यात शेंगदाण्याचे वाटण, मीठ आणि चवीपुरती साखर घाला. जराशी आंबट चव आवडत असेल तर दोन-तीन आमसूल टाका आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद करा. 

मिसळ कृती :

एका खोलगट डिशमध्ये खिचडी, बटाट्याचे तुकडे टाका. आवडत असेल तर वरईचा भातही तुम्ही यात टाकू शकता.त्यावर चमचाभर नायलॉन साबुदाणा चिवडा, थोडीशी बटाट्याची शेव, कुस्करलेले वेफर्स, चमचाभर दही घाला. त्यावर मिरचीचा ठेचा,चिरलेली काकडी खारे किंवा तळलेले शेंगदाणे आवडीनुसार घाला. हवं असल्यास लिंबू पिळा. या मिसळीसोबत गरमागरम आमटी द्या. मिसळ एकजीव करण्यासाठी आवडीनुसार त्यात आमटी घेता येते. आवडत असल्यास त्यात डाळिंबाचे दाणेही घालता येतील. 

Web Title: Ashadhi Ekadashi2018: try once Upavasachi Misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.