शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

एल्कलाइन डाएट म्हणजे काय? जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:21 IST

शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अनेक पोषक घटकांसोबतच शरीरातील पीएच लेव्हलही स्थिर असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच लेव्हल नॉर्मल नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अनेक पोषक घटकांसोबतच शरीरातील पीएच लेव्हलही स्थिर असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच लेव्हल नॉर्मल नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरामध्ये पीएच लेव्हल सामान्य ठेवण्यासाठी तुमचा आहार योग्य असणं गरजेचं असतं. अशातच एल्कलाइन डाएट म्हणजे क्षारयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. 

का आवश्यक ठरतं एल्कलाइन डाएट?

रक्तामधील पीएच स्तर 7.35 ते 7.45 च्या मध्ये असणं गरजेचं असतं. जर शरीरातील पीएच स्थर कमी झाला तर अनेक शरीराच्या समस्यांचा सामना करावा लागतो. सतत थकवा जाणवणे, पोटाच्या समस्यांचा सामना करणं आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यांसारख्या परिणामांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे शरीराला अनक आजार जडण्याची भिती असते. त्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यासाठी एल्कलाइन डाएट फॉलो करणं गरजेचं असतं. 

एल्कलाइन डाएटचे फायदे :

एल्कलाइन डाएटचं काम शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखणं हे असतं. शरीरात जास्त आल्म पदार्थ झाल्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. तसेच शरीरातील पेशींचं काम सुरळीत राहण्यासाठी शरीर डीटॉक्स करणंदेखील अत्यंत आवश्यक असतं. एल्कलाइन डाएट हेच काम करतं. याव्यतिरिक्त एल्कलाइन डाएट अॅन्टी-एजिंग प्रॉब्लेम्स दूर करण्यासोबतच पचनक्रिया मजबूत करण्याचेही काम करते. 

तणावापासून दूर ठेवते एल्कलाइन डाएट

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस ताण-तणाव, प्रदुषण, आजार यांसारख्या समस्यांमुळे शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. अशातच आहारामध्ये काही एल्कलाइन पदार्थांचा समावेश केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीरातील पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. त्यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. 

वजन कमी करण्यासाठी मदत करतं एल्कलाइन डाएट

कॅन्सर आणि अर्थराइटिसचा धोक कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही मदत करत एल्कलाइन डाएट. दरम्यान एल्कलाइन डाएट बॉडीला क्लिंज करून आजारांपासून दूर ठेवतं. 

डाएटमध्ये समावेश करा एल्काइन फुड्सचा :

कंदमुळं 

एल्कलाइन डाएटमध्ये मूळा (पांढरा, लाल आणि काळा), बीट, गाजर यांसारख्या पदार्थांचं सेवन करा. 15 ते 20 मिनिटं वाफेवर शिजवल्यानंतर असचं सेवन करू शकता. यामुळे दिवसभर पोट भरल्याप्रमाणे वाटते आणि शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जाही मिळते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

ब्रोकली 

ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि यांसारख्या इतर भाज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील पीएच लेव्हल नियंत्रणात राहते. त्याचबरोबर याचे सेवन केल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासह कॅन्सरपासूनही बचाव होतो. 

हिरव्या पालेभाज्या

कोबी, बीटाची भाजी, पालक इत्यादी भाज्यांचा समावेश होतो. यातील पालक सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि फोलेट अॅसिडचे मुबलक प्रमाणात असते. जे पोटाच्या समस्यांसोबतच शरीरातील पीएच लेव्हल बॅलन्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

लसूण 

शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने लसणाचं नाव घेतलं जातं. हृदयासाठी फायदेशीर असण्यासोबतच पीएच लेव्हल बॅलेन्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, हाय ब्लडप्रेशर आणि लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. 

शिमला मिरची

शिमला मिरचीचा समावेश क्षारयुक्त आहारामध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले एंजाइम्स आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. एवढेच नाही तर ताण आणि डिफ्रेशनसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही मदत करते. 

लिंबू

लिंबामध्ये निसर्गतःच अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लिंबू खोकला, सर्दी, ताप आणि छातीत होणारी जळजळ यावर फायदेशीर ठरते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य