शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
2
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
3
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
4
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
5
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
6
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
7
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
8
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
9
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
10
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
11
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
12
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
13
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
14
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
15
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
16
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
17
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
18
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
19
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
20
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
Daily Top 2Weekly Top 5

आहारातील 'हे' 5 पदार्थ रक्त शुद्ध करण्यासाठी करतात मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 15:13 IST

रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक पदार्थांबाबत सांगण्यात आले आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यामध्ये सोडिअम, यूरिया यांसारखी घातक तत्वही असतात.

रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक पदार्थांबाबत सांगण्यात आले आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यामध्ये सोडिअम, यूरिया यांसारखी घातक तत्वही असतात. जी आपल्या रक्तामध्ये मिसळून जातात आणि अनेक आजारांचा धोरका वाढवतात. जर तुमच्या किडन्यांचे आरोग्य उत्तम असेल तर शरीरातील घातक आणि विषारी घटक शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. रक्त अशुद्ध असल्यामुळे त्वचेच्या समस्या, पिंपल्स, डाग आणि किडनीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे किडन्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासोबतच रक्त शुद्ध ठेवणंही अत्यंत आवश्यक असतं. 

शिमला मिरची शिमला मिरची फक्त रक्त आणि किडन्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नाही तर पचनक्रिया सुरळीत ठेवून रक्तप्रवाह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि फॉस्फोरस यांसारखी खनिज तत्व असतात. 

जेवल्यानंतर बडिशोप फायदेशीर 

बडिशोप रक्त स्वच्छ करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. दररोज बडिशोपचा वापर केल्यामुळे रक्त डिटॉक्सिफाय होतं आणि अशुद्ध घटक शरीरातून बाहेर निघून जातात. दररोज जेवल्यानंतर 5 मिनिटांनी एक चमचा बडिशोपमध्ये अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करून त्याचे सेवन करा. 

रक्त स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी 

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू एकत्र करून त्याचं सेवन करा. हे मिश्रण पोट स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. हे लिव्हरमधील एंजाइमचं उत्पादन वाढवतं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

लिंबामध्ये असलेलं अॅसिड पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करते. 

लसूण आलं आणि कांदा नक्की खा

जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये जेवण तयार करण्यासाठी लसूण, आलं आणि कांद्याचा वापर करण्यात येतो. पण हे तीन पदार्थ शिजल्यानंतर तेवढे फायदेशीर राहत नाहीत. जेवढे कच्चे असतात, तेवडे हे पदार्थ फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये थोडासा कच्चा लसूण, आलं आणि कांदा एकत्र करा. 

तुम्ही फळं आणि भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या सलाडमध्येही हे पदार्थ एकत्र करून खाऊ शकता. हे रक्त वेगाने स्वच्छ करतात आणि नवीन रक्तेशी तयार करण्यासाठी मदत करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स