'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या दादूसने घेतली नवीन गाडी! नातवाचा आनंद गगनात मावेना, शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:30 IST2026-04-21T13:28:22+5:302026-04-21T13:30:58+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम यांनी नवीन गाडी विकत घेतली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

maharashtrachi hasyajatra fame actor arun kadam buy new car share video on social media  | 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या दादूसने घेतली नवीन गाडी! नातवाचा आनंद गगनात मावेना, शेअर केला खास व्हिडीओ

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या दादूसने घेतली नवीन गाडी! नातवाचा आनंद गगनात मावेना, शेअर केला खास व्हिडीओ

Arun Kadam New Car: मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर अरुण कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत अरुण कदम यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांच्या आग्री कोळी स्टाइलचे अनेकजण चाहते आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील त्यांचे प्रत्येक स्कीट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. दरम्यान,आपल्या विनोदी  शैलीने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या अरुण कदम यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. 


अभिनेते अरुण कदम सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच ते वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असतात. अशातच नुकतीच प्रेक्षकांच्या लाडक्या दादूसने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

अरुण कदम यांनी 'मारुती SUV Victoris' ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत सुमारे १०.४९ लाख ते १९.९९ लाख इतकी आहे.या नव्या गाडीच्या खरेदीसाठी अरुण यांचं कुटुंबिय एकत्र पोहोचले होते. नवीन गाडी घेतल्यानंतर अरुण कदम यांनी लाडक्या नातवाला मांडीवर घेऊन ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, नवीन गाडी खरेदी केल्याबद्दल अरुण कदम यांचं चाहते आणि सेलिब्रिटींनी अभिनंदन केलं आहे. 

Web Title : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम ने खरीदी नई कार, पोता खुश!

Web Summary : अपनी कॉमेडी के लिए जाने जाने वाले अरुण कदम ने मारुति एसयूवी विक्टोरिस खरीदी। परिवार ने नई खरीद का जश्न मनाया, कदम ने अपने पोते का कार का आनंद लेते हुए एक वीडियो साझा किया। प्रशंसकों और हस्तियों ने उन्हें बधाई दी।

Web Title : Arun Kadam, 'Maharashtrachi Hasyajatra' fame, buys new car; grandson overjoyed!

Web Summary : Arun Kadam, known for his comedy, bought a Maruti SUV Victoris. The family celebrated the new purchase, with Kadam sharing a video of his grandson enjoying the car. Fans and celebrities congratulated him.