हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 10:53 IST2026-05-03T10:53:02+5:302026-05-03T10:53:37+5:30

तारा आणि आदित्यच्या वयात किती आहे अंतर?

tara sutaria after breaking up with veer pahariya now allegedly dating aditya roy kapur know more | हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण

हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण

बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या जोडीची जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाला हे सर्वांना माहितच आहे. तारा आता अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. सुरुवातीला आदित्य आणि तारा यांच्या नावाचा संबंध त्यांच्या 'ओम' या आगामी ॲक्शन चित्रपटाच्या निमित्ताने जोडला जात होता, मात्र आता हे नाते केवळ चित्रपटापुरते मर्यादित न राहता एका रोमँटिक वळणावर पोहोचल्याचे बोलले जात आहे.

'फिल्मफेअर'रिपोर्टनुसार, आदित्य आणि तारा आता अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही काळापासून या दोघांना बॉलिवूडमधील विविध पार्ट्यांमध्ये आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले होते, तेव्हापासूनच चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली होती. 'ओम' चित्रपटाच्या वर्कशॉप दरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री पहिल्यांदा चर्चेत आली होती, जी आता एका घट्ट नात्यात बदलल्याचे दिसते. जरी या दोन्ही कलाकारांनी अद्याप मौन पाळले असले, तरी त्यांना वारंवार एकत्र पाहिल्यामुळे या चर्चा जास्तच जोरात सुरु आहेत. विशेष म्हणजे दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. 

२०२६ च्या सुरुवातीला ए.पी. ढिल्लोच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या एका प्रसंगानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला. जरी त्यांनी ब्रेकअपबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, वीरच्या वाढदिवसाला ताराची अनुपस्थिती आणि अलीकडच्या काळात त्यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमात जाणे, यावरून त्यांच्यातील दुरावा स्पष्ट झाला आहे. तारा सुतारिया ही २०२६ च्या सुरुवातीलाच मुंबईत आपल्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे, ज्याचा आनंद तिने नुकताच साजरा केला होता. अशातच तिच्या आयुष्यात आदित्य रॉय कपूरची एन्ट्री झाल्याने बी-टाऊनमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या नवीन जोडीच्या जवळच्या सूत्रांनीही त्यांच्यामध्ये एक मजबूत नाते असल्याचे संकेत दिले आहेत. आता ही जोडी आपल्या नात्याची अधिकृत कबुली कधी देणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Web Title : तारा सुतारिया आदित्य रॉय कपूर को डेट कर रही हैं? बॉलीवुड में चर्चा!

Web Summary : तारा सुतारिया के ब्रेकअप के बाद आदित्य रॉय कपूर को डेट करने की अफवाहों से बॉलीवुड में चर्चा है। 'ओम' के दौरान उनकी केमिस्ट्री से रोमांस शुरू हुआ, अब अक्सर साथ देखे जाते हैं। आधिकारिक पुष्टि का इंतजार।

Web Title : Tara Sutaria Dating Aditya Roy Kapur? Buzz in Bollywood!

Web Summary : Bollywood buzzes with rumors of Tara Sutaria dating Aditya Roy Kapur after her breakup. Their chemistry during 'Om' sparked romance, now seen together often. Official confirmation awaited.