Say NO To Maldives! लक्षद्वीप नाही व्हॅकेशनसाठी मालदीवला पोहोचली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:57 PM2024-01-08T12:57:25+5:302024-01-08T13:07:12+5:30

Maldive vs Lakshadweep वादादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालदीव व्हॅकेशन, नेटकऱ्यांनी केल ट्रोल, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव्सच्या मंत्र्यांनी मोदींविरोधात टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतीयांनी सुरू केलेल्या बायकॉट मालदीव वादात अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली.

बॉलिवूडमधील अक्षय कुमार, सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले. मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादादरम्यान आता एका टीव्ही अभिनेत्रीने मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अदिती भाटिया सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अदितीने मालदीव व्हॅकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत तिने "vacay cam" असं कॅप्शन दिलं आहे. पण, मालदीवमध्ये व्हॅकेशनसाठी गेलेल्या अदितीला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे.

अदितीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट करत "नो मालदीव फक्त लक्षद्वीप" अशी कमेंट केली आहे.

तर दुसऱ्याने "Say No to Maldives" असं कमेंटमध्ये लिहिलं आहे. "लक्षद्वीपला जा" अशी कमेंटही केली आहे.

"बॉयकॉट मालदीव टुरिझम", असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

अदितीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये हे मोहब्बते' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अदिती सोशल मीडियावरही सक्रिय असते.