फोटोतील मुलीला ओळखलंत का? 'पानिपत' चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका, 'या' मराठी मालिकेत करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:15 IST2026-04-22T18:07:41+5:302026-04-22T18:15:01+5:30
फोटोतील 'या' मुलीला ओळखलंत? 'पानिपत' चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका, आता गाजवतेय मराठी मालिकाविश्व

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित एक भव्य ऐतिहासिक युद्धपट २०१९ साली प्रदर्शित झाला.

अटकेपार पोहोचलेल्या मराठय़ांनी लढलेल्या सर्वात मोठय़ा लढाईची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली.

या चित्रपटात सदाशिवराव भाऊंच्या व्यक्तिरेखेला अर्जुन कपूर पाहायला मिळाला. तसेच संजय दत्त-अहमद शाह अब्दाली व क्रिती सनॉनने- पार्वती बाई यांच्या मुख्य भूमिका साकारली.

परंतु, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटात मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते देखील झळकली होती. ही अभिनेत्री म्हणजे कृतिका देव.'पानिपत' चित्रपटामध्ये कृतिकाने राधिका बाई ही भूमिका साकारली.

कृतिकाने चित्रपट, वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप तिने प्रेक्षकांच्या मनावर उमटवली.

कृतिकाने २०१४ मध्ये 'एलिस इन हॅप्पी जर्नी' या मराठी सिनेमातून इंडस्ट्रीत एन्ट्री केली. २०१५ मध्ये तिने 'प्राइम टाइम' आणि 'राजवाडे आणि सन्स' या चित्रपटात काम केलं. बहुचर्चित ताली या वेबसीरिजमध्ये देखील तिने काम केलंय.

सध्या कृतिका स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लंपडाव' या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.

















