Maharashtra Day 2022: "राकट देशा, कणखर देशा.." रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 12:28 PM2022-05-01T12:28:39+5:302022-05-01T12:31:37+5:30

Maharashtra Day 2022: यावेळी रसिकाने पारंपरिक मराठमोळ्या थाटात नवं फोटोशूट केलं असून तिने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या रसिकाने या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.

शनाया ही भूमिका साकारुन रसिका खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

रसिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

कोणताही सणवार असो वा समाजात एखादी घडामोड घडली की रसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळा व्यक्त होते.

यावेळी रसिकाने पारंपरिक मराठमोळ्या थाटात नवं फोटोशूट केलं असून तिने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा, नाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा. श्री महाराष्ट्र देशा….महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा", असं कॅप्शन देत रसिकाने तिचे फोटो शेअर केले आहेत.

रसिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हाय़रल होत असून त्याला विशेष पसंती मिळत आहे.