महिन्याला लाखोंची कमाई, 2.5 कोटी रूपयांचं घर...जाणून घ्या किती आहे सुनील ग्रोवरची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:36 PM2023-01-25T12:36:10+5:302023-01-25T12:45:24+5:30

Sunil Grover Net Worth: तसा हा फोटो सुनीलने गंमत म्हणून शेअर केला होता. असे फोटो तो नेहमीच टाकत असतो. पण सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा आहे.

सुनील ग्रोवर हा नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोत तो बटाटे आणि कांदे विकताना दिसत आहे. पण हा भाजी 'विकणारा' अभिनेता किती संपत्तीचा मालक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या.

तसा हा फोटो सुनीलने गंमत म्हणून शेअर केला होता. असे फोटो तो नेहमीच टाकत असतो. पण सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा आहे. कुणी म्हणत आहे की, कपिल शर्मा शोनंतर सुनीलची काय हालत झालीये. तर कुणी भाज्यांचे भाव विचारताहेत. पण त्याची संपत्ती किती आहे?

रीअल लाइफमध्ये सुनील ग्रोवर एक शाही जीवन जगतो. जीवन जगण्यासाठी जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त त्याच्याकडे आहे. त्यामुळेच तो एक समाधानी आणि शाही जीवन जगतो. त्याच्याकडे घर, गाड्या, पैसा आणि काम सगळंच आहे.

त्याच्या घराबाबत सांगायचं तर मुंबई शहरात एक रूम मिळणं फार अवघड आहे. पण आपल्या इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर सुनील आलिशान घर तयार केलं आहे. त्याच्या घराची किंमत साधारण अडीच कोटी रूपये आहे. ज्यात तो परिवारासोबत आनंदाने राहतो.

घरासोबतच सुनीलकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. ज्यांची किंमतही कोट्यावधी आहे. त्याच्याकडे BMW 5 आणि BMW 7 कार आहे. ज्यांची किंमत 60 लाख रूपये आणि 1 कोटी रूपये आहे.

सुनीलच्या कमाईबाबत सांगायचं तर तो एक अभिनेता आणि कॉमेडिअन आहे. टीव्ही शोजपासून ते सिनेमात तो दिसतो. अनेक जाहिराती करतो. अनेक स्टेज शो करतो. ज्यातून तो लाखो रूपये कमाई करतो. काही रिपोर्टनुसार, त्याच्याकडे जवळपास एकूण 21 कोटी रूपयांची संपत्ती आहे.