'मिर्झापूर: द मूव्ही'ची रिलीज डेट समोर, ॲक्शनचा भडिमार अन् दमदार कथा; कधी येतोय सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:30 IST2026-04-22T16:30:07+5:302026-04-22T16:30:32+5:30
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण दिव्येंदू शर्मा म्हणजेच 'मुन्ना भैया'चे पुनरागमन.

'मिर्झापूर: द मूव्ही'ची रिलीज डेट समोर, ॲक्शनचा भडिमार अन् दमदार कथा; कधी येतोय सिनेमा?
'मिर्झापूर' वेब सीरिजच्या तीनही सीझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत असतानाच निर्मात्यांनी 'मिर्झापूर: द मूवी'ची घोषणा करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटात केवळ जुने कलाकारच परतणार नाहीत, तर कथेचा कॅनव्हासही मोठा असणार आहे.
कालीन भैया, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैयाची त्रिमूर्ती पुन्हा एकत्र
या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण दिव्येंदू शर्मा म्हणजेच 'मुन्ना भैया'चे पुनरागमन. वेब सीरिजमध्ये मुन्ना भैयाची एक्झिट झाली असली, तरी चित्रपटात तो पुन्हा एकदा स्वॅगमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी (कालीन भैया) आणि अली फजल (गुड्डू पंडित) हे दिग्गज कलाकार आपापल्या भूमिकेत पाहायला मिळतील.
महिला पात्रांची भूमिका अधिक दमदार
यावेळी निर्मात्यांनी कथेमध्ये थोडा बदल केला आहे. रिपोर्टनुसार, 'मिर्झापूर: द मूवी'मध्ये महिला पात्रांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाणार आहे. त्यांना केवळ स्क्रीन स्पेसच जास्त मिळणार नाही, तर त्यांचे पात्र अत्यंत शक्तिशाली आणि कथा फिरवणारे असणार आहे. 'मिर्झापूर'च्या सत्तेच्या लढाईत आता स्त्रियांचा दबदबा पाहायला मिळेल.
काय असेल चित्रपटाची कथा?
हा चित्रपट थेट सीझन ४ ची कथा पुढे नेणार नाही, तर हा स्वतंत्र चॅप्टर असेल. यात मिर्झापूरचं जग अधिक भव्य स्तरावर सादर केले जाईल. गुरमीत सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट ॲक्शन आणि थ्रिलरचा जबरदस्त डोस असेल, असे सांगितले जात आहे.
कधी होणार प्रदर्शित?
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. 'मिर्झापूर: द मूवी' ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वेब सीरिजच्या प्रेक्षकांसाठी ही चित्रपट आवृत्ती म्हणजे एक मोठी मेजवानी ठरणार आहे.