बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:52 IST2026-04-17T16:51:54+5:302026-04-17T16:52:28+5:30

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत

bollywood actor vidyut jammwal bald look in Street Fighter hollywood movie | बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

बॉलिवूडचा 'ॲक्शन स्टार' विद्युत जामवाल आता हॉलीवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या 'स्ट्रीट फायटर' (Street Fighter) या बहुप्रतीक्षित हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यात तो नोआ सेंटिनियो, जेसन मोमोआ आणि अँड्र्यू कोजी यांसारख्या जागतिक सुपरस्टार्ससोबत जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे.

ट्रेलरची झलक आणि विद्युतचा लुक

पॅरामाउंट पिक्चर्सने प्रदर्शित केलेला सुमारे ३ मिनिटांचा हा ट्रेलर थरारक ॲक्शन आणि बॉक्सिंग रिंगमधील लढाईने भरलेला आहे. या चित्रपटात विद्युत जामवालचा लुक अत्यंत खतरनाक दिसत असून, त्याची पिळदार शरीरयष्टी आणि 'बाल्ड लुक' (टक्कल) सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. किताओ साकुराई यांचा हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ गेम 'स्ट्रीट फायटर'वर आधारित आहे.

चित्रपटाची कथा १९९३ च्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. एकमेकांपासून दुरावलेले स्ट्रीट फायटर्स रयू (अँड्र्यू कोजी) आणि केन मास्टर्स (नोआ सेंटिनियो) यांना पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागते. त्यांना 'वर्ल्ड वॉरियर टूर्नामेंट'साठी निवडले जाते, परंतु या स्पर्धेच्या मागे एक जीवघेणे कारस्थान दडलेले असते. या चित्रपटात विद्युत जामवाल 'धलसिम' नावाच्या पात्राची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये त्याची दोन-तीन वेळा झलक पाहायला मिळते. एका भारतीय अभिनेत्याला अशा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचा भाग होताना पाहून चाहते सोशल मीडियावर अभिमान व्यक्त करत आहेत.

Web Title : विद्युत जामवाल हॉलीवुड फिल्म 'स्ट्रीट फाइटर' में, बाल्ड लुक से चौंकाया।

Web Summary : विद्युत जामवाल हॉलीवुड की 'स्ट्रीट फाइटर' में धमाल मचाने को तैयार। ट्रेलर में विद्युत 'धलसिम' के रूप में नोआ सेंटिनियो और जेसन मोमोआ के साथ एक्शन करते दिख रहे हैं। उनका बाल्ड लुक चर्चा में है।

Web Title : Vidyut Jammwal stuns in 'Street Fighter' Hollywood debut, bald look revealed.

Web Summary : Vidyut Jammwal debuts in Hollywood's 'Street Fighter' as Dhalsim alongside global stars. The trailer showcases intense action, a gripping storyline set in 1993, and Jammwal's striking bald look, exciting fans.