'हिची चाल कधी सुधरायची नाही'; बँकलेस गाऊन अन् हाय हिल्स घातल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:14 IST2026-04-23T10:14:04+5:302026-04-23T10:14:41+5:30
Malaika arora: अलिकडेच मलायकाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने बॅकलेस शिमरी गाऊन परिधान केला होता.

'हिची चाल कधी सुधरायची नाही'; बँकलेस गाऊन अन् हाय हिल्स घातल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि बोल्ड अंदाजामुळे विशेष ओळखली जाते. वयाच्या ५२ व्या वर्षीदेखील ती चांगलीच फिट आहे. सोशल मीडियावरही ती तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु, तिचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
अलिकडेच मलायकाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने बॅकलेस शिमरी गाऊन परिधान केला होता. सोबतच तिने हाय हिल घातल्या होत्या. आणि, डार्क, बोल्ड असा मेकअप केला होता. मात्र, तिचा हा लूक नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. परिणामी, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

काय म्हणाले ट्रोलर्स?
'ही कायम अशीच चालत राहणार, सरळ चालूच शकत नाही का?','या ड्रेसमध्ये तर उठा-बसायलाही जमायचं नाही',' जरा जपून बस मलायका, नाही तर ड्रेस फाटायचा', 'हिची चाल कधी सुधरायची नाही', 'ही अशी बदकासारखी काय चालते?' असं म्हणत नेटकऱ्यांनी मलायकाला चांगलंच ट्रोल केलं आहे.
दरम्यान, मलायकाने अनेक सिनेमांमध्ये आयटम साँग करुन लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या वर्षी ती थामा या सिनेमात प्वाइजन बेबी या गाण्यात झळकली होती. तसंच ती करण जोहरच्या पिच टू गेट रिच या कार्यक्रमातही दिसून येत आहे. सोबतच तिने नवज्योत सिंह सिद्धू आणि शान यांच्यासोबत इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्येही जजची भूमिका पार पाडली होती.