मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:19 IST2026-03-18T17:15:11+5:302026-03-18T17:19:02+5:30

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. धुरंधर २ चे शो रद्द झाल्याचं समजतंय. कारण आलं समोर

Dhurandhar 2 shows are getting cancelled! Fans are very disappointed, has the reason come to light? | मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय?

मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय?

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे कन्नड, तेलगू आणि तमिळ भाषांमधील 'पेड प्रिव्ह्यूज' (Paid Previews) निर्मात्यांनी शो सुरु व्हायला काही तास बाकी असताना रद्द केले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल आणि कट्स लागू करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, CBFC ने चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र देताना काही दृश्ये आणि संवादांवर कात्री चालवण्याचे आदेश दिले होते. ऐनवेळी हे बदल आल्याने सर्व भाषेतील प्रिंट्स वेळेत तयार करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण झाल्यामुळे, निर्मात्यांनी दाक्षिणात्य राज्यांमधील प्रिव्ह्यू शोज रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या भागातील चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे. तरीही उद्यापासून ठरलेल्या वेळेनुसार दाक्षिणात्य भागांत चित्रपट रिलीज होईल.

केवळ दक्षिण भारतातच नाही, तर इतर काही महत्त्वाच्या ठिकाणीही या तांत्रिक कारणांमुळे रिलीजपूर्वीचे विशेष शो रद्द करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार करण्यात आलेले बदल सर्व थिएटर्समधील डिजिटल फॉरमॅटमध्ये अपडेट करण्यासाठी चित्रपट वितरकांना अधिक वेळ हवा होता. त्यामुळे कोणताही गोंधळ टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा सुरक्षित मार्ग निवडला. त्यामुळे काही ठिकाणचे शो रद्द करण्यात आले आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असतानाच, सेन्सॉर बोर्डाचे कट्स आणि आता प्रिव्ह्यू शोज रद्द होणे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची निराशा झाली आहे. 'धुरंधर २' बद्दल सांगायचं तर, या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title : धुरंधर 2' के शो रद्द! प्रशंसकों के लिए निराशा; क्या है कारण?

Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर 2' के दक्षिण भारत में पेड प्रिव्यू रद्द, सेंसर कट के कारण प्रिंट में देरी हुई। फिल्म तय समय पर रिलीज होगी। तकनीकी कारणों से अन्य जगहों पर भी स्पेशल शो रद्द किए गए।

Web Title : 'Dhurandhar 2' Shows Canceled! Disappointment for Fans; What's the Reason?

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' paid previews in South India are canceled due to last-minute censor cuts. Print delays forced the decision, disappointing fans. The film will release as scheduled. Special shows elsewhere were also affected due to technical issues.