अचानक चित्रपटातून माघार घेतली अन् वाद विकोपाला गेला! रणवीर सिंगचा 'डॉन-३' बाबत मोठा निर्णय, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:07 IST2026-04-23T10:03:15+5:302026-04-23T10:07:11+5:30

अखेर रणवीर सिंग अन् फरहान मधील वाद मिटला! 'डॉन-३' बाबत अभिनेत्याने घेतला 'हा' निर्णय 

bollywood actor dhurandhar 2 fame ranveer singh return his signing amount to settle the don 3 dispute with farhan akhtar | अचानक चित्रपटातून माघार घेतली अन् वाद विकोपाला गेला! रणवीर सिंगचा 'डॉन-३' बाबत मोठा निर्णय, प्रकरण काय?

अचानक चित्रपटातून माघार घेतली अन् वाद विकोपाला गेला! रणवीर सिंगचा 'डॉन-३' बाबत मोठा निर्णय, प्रकरण काय?

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्यांच्या 'धुरंधर २' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाला अजूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. मात्र,एकीकडे धुरंधरचं यश अनुभवत असताना दुसरीकडे रणवीर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. रणवीर डॉन-३ या चित्रपटामुळे देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गाजलेल्या डॉन  चित्रपटाची फ्रेंचायझी असलेल्या या चित्रपटातून रणवीरने माघार घेतली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. अनेक दिवसांपासून फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि रणवीर यांच्यात सुरू असलेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता. आता रणवीरने या चित्रपटासंबधित एक मोठा निर्णय घेतला आहे.

रणवीर सिंगने पुढाकार घेत हा वाद मिटवण्याचं ठरवलं आहे.'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार,अभिनेत्याने रणवीर सिंगने एक्सल एंटरटेनमेंटला आपली साइनिंग अमाऊंट परत करण्यास सहमती दर्शवली आहे. ही रक्कम १० कोटी रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त,सिनेमात भागीदारी देणार असल्याच बोललं जात आहे. पण नफ्याची टक्केवारी किती असेल, हे निश्चित नाही. विशेष म्हणजे, रणवीर सिंह, फरहान अख्तर किंवा स्टुडिओकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

फरहान अख्तरने तीन वर्षांपूर्वी रणवीर सिंगसोबत 'डॉन 3' चित्रपट सुरू केला होता. सुरुवातीला कियारा अडवाणी या चित्रपटाचा भाग होती, पण मातृत्व रजेमुळे तिने चित्रपट सोडला. प्री-प्रोडक्शनमुळे चित्रपट पुढे ढकलला गेला आणि नंतर रणवीर सिंग 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' मध्ये व्यस्त झाला. त्यात अचानक रणवीरने चित्रपटातून माघार घेतल्याने याचं निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.

रिपोर्टनुसार,'क्रिएटिव डिफरन्स'मुळे हा सिनेमा सोडल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर एक्सेल एंटरटेनमेंटने प्री-प्रोडक्शन आणि नियोजित वेळेचे नुकसान भरपाई म्हणून रणवीरकडे चक्क ४० कोटींची मागणी केल्याच्या चर्चा होत्या. आता स्वत: रणवीरने फरहानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी हात पुढे करत हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : रणवीर सिंह ने 'डॉन 3' छोड़ी, साइनिंग राशि लौटाकर विवाद सुलझाया।

Web Summary : रणवीर सिंह ने 'डॉन 3' से किनारा कर लिया, और एक्सेल एंटरटेनमेंट को अपनी साइनिंग राशि वापस करके विवाद को सुलझा लिया। रचनात्मक मतभेद और समय की कमी के कारण यह मुद्दा उठा था। अब फरहान अख्तर के साथ संबंध सुधारने पर ध्यान दे रहे हैं।

Web Title : Ranveer Singh exits 'Don 3', dispute settled with signing amount return.

Web Summary : Ranveer Singh exited 'Don 3', settling a dispute by returning his signing amount to Excel Entertainment. Creative differences and scheduling conflicts fueled the issue. He's prioritizing mending relationships with Farhan Akhtar.