Happy Propose Day 2026: होकार हवाय? मग जोडीदाराला पाठवा या हृदयस्पर्शी ओळी; पाहा प्रपोज डे विशेष रोमँटिक मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:30 IST2026-02-07T16:21:16+5:302026-02-07T16:30:45+5:30
Happy Prapose Day 2026: व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे, त्यात ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे आहे, त्यानिमित्त निवडक संदेश खास तुमच्यासाठी!

Happy Propose Day 2026: होकार हवाय? मग जोडीदाराला पाठवा या हृदयस्पर्शी ओळी; पाहा प्रपोज डे विशेष रोमँटिक मेसेज
व्हॅलेंटाईन वीकचा(Valentine Week 2026) सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी दिवस म्हणजे 'प्रपोज डे(Prapose Day 2026) एखाद्यावर मनापासून प्रेम करणं सोपं असतं, पण ते प्रेम योग्य शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही एक कला आहे. कधी कधी ओठांवर आलेले शब्द हृदयाच्या धडधडीमुळे मागे फिरतात. अशा वेळी कवितेच्या ओळी आणि मनाला भिडणाऱ्या चारोळ्या तुमच्या मदतीला धावून येतात.
जर तुम्हीही कोणाला आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आजचा हा दिवस तुमची 'गोष्ट मनातली' सांगण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या प्रेमाला होकार मिळवून देण्यासाठी पुढील प्रपोजल तुमच्या मदतीस येतील. ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे आहे, त्यानिमित्त निवडक संदेश खास तुमच्यासाठी!
शब्दात सांगता येणार नाही, इतकं प्रेम तुझ्यावर करतो... आज या प्रपोज डे निमित्त, फक्त तुझाच व्हायचं म्हणतो! Happy Propose Day!
हातात हात घेऊन तुझं, आयुष्यभर चालायचं आहे... तुझ्या डोळ्यांत पाहून मला, माझं जग पाहायचं आहे! माझी होशील का? Happy Propose Day!
स्वप्नात तर तू रोजच येतेस, आता सत्यातही ये ना... माझ्या या छोट्याशा आयुष्याची, सोबती तू हो ना! Happy Propose Day!
तू सोबतीला असावीस, प्रत्येक वळणावर... तुझं हसणं उमलावं, माझ्या प्रत्येक क्षणावर! Happy Propose Day!
काहीच नको मला, या जगाच्या गर्दीत... फक्त तुझी साथ हवीय,सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात! Happy Propose Day!
आज विचारतोय तुला, गोष्ट मनातली... होशील का पार्टनर माझी आयुष्यभराची? Happy Propose Day!
वाट बघेन मी तुझी, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत... प्रेम करत राहीन तुझ्यावर, या जगाच्या अंतापर्यंत! होशील का माझ्या आयुष्याची सोबती? Happy Propose Day!
तुझ्या हसण्यानेच सुरू होतो माझा दिवस, आणि तुझ्या आठवणीतच मावळतो माझा सूर्य... हे आयुष्य तुझ्या नावावर करायचंय, देणार का मला तुझं सर्वस्व? Happy Propose Day!
तुला मागणी घालण्यासाठी आजचा दिवस केवळ एक निमित्त आहे, खरं तर मला प्रत्येक क्षणी फक्त तूच हवी आहे! Happy Propose Day!