यूट्यूब बनले डॉक्टरांचा गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 01:03 IST2016-03-05T08:03:52+5:302016-03-05T01:03:52+5:30

अनेक डॉक्टर यूट्यूब वरचे व्हिडियोपाहून आॅपरेशनची नवी टेक्निक शिकतात अशी रंजक माहिती समोर आली आहे.

YouTube became a doctor's doctor | यूट्यूब बनले डॉक्टरांचा गुरू

यूट्यूब बनले डॉक्टरांचा गुरू

हिडियो स्ट्रिमिंग वेबसाईट यूट्यूबवर काय नाही? संपूर्ण जगात व्हिडियोसाठी सर्वाधिक लोकप्रिय साईट म्हणून तिची ओळख आहे. पण त्यावर केवळ गाणी, ट्रेलर, फनी व्हिडियो अशा टाईपपास गोष्टीच होतात असे नाही.

अनेक डॉक्टर यूट्यूब वरचे व्हिडियोपाहून आॅपरेशनची नवी टेक्निक शिकतात अशी रंजक माहिती समोर आली आहे.

‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी आॅफ फेशियल प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह’च्या (एएएफपीआरएस) सदस्यांच्या सर्व्हेतून असे दिसून आले की, त्यांपैैकी बहुतेक डॉक्टरांनी किमान एकदा तरी यूट्यूबवर उपलब्ध असणारे सर्जरी व्हिडियोज् पाहून नवीन गोष्ट शिकली आहे.

एमरॉय विद्यापीठाच्या वैैद्यकिय कॉलेजच्या अनिता सेठना यांनी ‘एएएफपीआरएस’च्या २०२ सदस्य डॉक्टरांचे सर्वेक्षण केले.

नवीन पद्धत शिकण्यासाठी किमान एकदा तरी यूट्यूबला भेट देण्याऱ्या डॉक्टरांची संख्या ६४.१ टक्के इतकी होती. त्यांपैैकी ८३.१ टक्के डॉक्टरांनी प्रत्यक्षात त्या नवीन पद्धतीचा वापर केला असे मान्य केले.

YouTube Doctor

अशा प्रकारे आॅनलाईन माहिती गोळ्या करण्यामध्ये नवशिके आणि अननुभवी डॉक्टरांची संख्या जास्त आहे. आजच्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी आणि वैैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांविषयी अपटूडेट राहण्यासाठी यूट्यूबचा वापर वाढला आहे, असादेखील या सर्वेक्षणातून निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Web Title: YouTube became a doctor's doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.