​‘रोलिंग स्टोन’चा ट्रम्पवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 18:27 IST2016-05-05T12:57:43+5:302016-05-05T18:27:43+5:30

‘रोलिंग स्टोन’ने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना प्रचार रॅलीमध्ये त्यांची गाणी वापरण्यावर आक्षेप घेतला आहे.

Trump poll for Rolling Stone | ​‘रोलिंग स्टोन’चा ट्रम्पवर आक्षेप

​‘रोलिंग स्टोन’चा ट्रम्पवर आक्षेप

रसिद्ध बँड ‘रोलिंग स्टोन’ने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना प्रचार रॅलीमध्ये त्यांची गाणी वापरण्यावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवड करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

रिपब्लिकन पार्टीकडून बहुचर्चित आणि वादग्रस्त डोनल्ड ट्रम्पला उमेदवारी मिळणार अशी चिन्हे आहेत. 3 मे रोजी इंडियाना येथे झालेल्या प्रायमरीमध्ये ट्रम्पने विजय मिळवल्यावर काढलेल्या मिरवणुकीत ‘रोलिंग स्टोन’चे हिट गाणे ‘स्टार्ट मी अप’ वाजविण्यात आले.

कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अशाप्रकारे गाणे वापरल्यामुळे नाराज झालेल्या बँड सदस्यांनी ट्रम्प यांना असे करण्यास मनाई केली आहे. एवढेच नाही तर मिक जॅगर व इतर सदस्यांनी त्यांच्या लीगल टीमला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बँडच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, ‘डोनल्ड ट्रम्प यांनी आमच्याकडून परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी बँडच्या गाण्यांचा वापर करणे बंद करावे.’ बरं ही काही पहिलीच वेळ नाही की ट्रम्पने विजयी रॅलीमध्ये या बँडची गाणी वापरली. 

Web Title: Trump poll for Rolling Stone