दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 15:24 IST2018-08-27T14:50:14+5:302018-08-27T15:24:17+5:30
अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो.

दीपिकाच्या फॅशन कलेक्शनबाबत तुम्हाला माहीत आहे का?
बॉलिवूडमधील हायप्रोफाइल लग्नांपैकी सध्या दीपिका पादुकोनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनयासह फॅशनवर्ल्डमध्येही आपल्या अदांनी धुमाकूळ घालणारी ही मस्तानी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे.
दीपिका काळ्या रंगाच्या कपड्यांना जास्त पसंती देते. तिच्या वॉर्डरोबमध्ये काळ्या रंगाचे वेगवेगळ्या टाईपचे कपडे तुम्हाला दिसून येतील.
अनेक चित्रपटांतील आपल्या लूकने दीपिकाने आपल्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. त्यातील तिचा साडीतील लूक नेहमीच चाहत्यांना भूरळ घालतो. खऱ्या आयुष्यातही दीपिकाला साडी नेसायला फार आवडतं. तिच्या वॉर्डरोबमध्ये अनेक पारंपारिक साड्या आहेत.
दीपिका मूळातच फार उंच आहे. त्यामुळे ती पायामध्ये हिल्स घालण्याऐवजी स्निकर्स घालण्यास अधिक पसंती देते.
दीपिका आपल्या बॅग्जच्याबाबतीतही फार सिलेक्टिव्ह आहे. तिला स्किन कलरच्या बॅग्ज फार आवडतात.
वेस्टर्न लूकमध्ये दीपिकाची पसंती बऱ्याचदा डेनिम आणि पांढऱ्या टॉप्सना अधिक असते. बऱ्याचदा तिला या लूकमध्ये पाहण्यात आले आहे.
दीपिकाला सिम्पल आणि सोबर लूक जास्त आवडतो. त्यामुळे ती अनेकदा लॉन्ग कुर्त्यांनाही पसंती देते.