Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:20 IST2018-10-15T17:13:07+5:302018-10-15T17:20:00+5:30
दरवर्षी नवरात्रोत्सवत अनेक नवीन फॅशन स्टाइल्स ट्रेंडमध्ये येत असतात. तर काही फॅशन ट्रेंडमधून आउट होतात.

Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती!
दरवर्षी नवरात्रोत्सवत अनेक नवीन फॅशन स्टाइल्स ट्रेंडमध्ये येत असतात. तर काही फॅशन ट्रेंडमधून आउट होतात. जर तुम्हीही कन्फ्यूज्ड असाल की, यावर्षी कोणत्या वस्तू ट्रेंडमध्ये आहेत तर जाणून घेऊयात सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन स्टाइल्सबाबत...

गरब्यामध्ये परिधान करण्यात येणारा ट्रेडिशनल ड्रेस म्हणजे महिलांसाठी चनिया-चोली आणि पुरूषांसाठी वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीमध्ये असलेले केडिया. मोठ्या पॅचवर्कच्या डिझाइनने त्यांना हेव्ही लूक देण्यात येतो. खासकरून बॅकलेस कच्छी कढाई करण्यात आलेले ब्लाउज आणि चोळी ट्रेंन्डमध्ये आहे. तुम्ही साडी किंवा लेहेंग्यासोबत वापरू शकता.

या नवरात्रीमध्ये पारंपारिक परंतु क्लासी लूक असणाऱ्या हेअरस्टाइल्स ट्रेन्डमध्ये आहेत. यामध्ये फुलं माळण्याचा ट्रेंड पुन्हा आला आहे.

बॅकलेस ब्लाउज घातल्यानंतर पाठ, मान आणि कंबरेवर टॅटू काढण्याचा ट्रेन्ड आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार परमन्ट किंवा टेम्पररी टॅटू काढून घेऊ शकता.

नवरात्रीमध्ये गरबा खेळताना अनेकदा घामामुळे तुमचा लूक बिघडू शकतो. अशावेळी तुम्ही वॉटरप्रुफ मेकअप ट्राय करू शकता.

मल्टीकलरच्या बांगड्या आणि कबंरपट्टा यांचाही सध्या ट्रेंड आहे. कंबरपट्टा तुम्ही साडी किंवा लेहेंग्यावर वापरू शकता.

कोल्हापुरी चप्पल कोणत्याही ट्रेडिशनल कपड्यांवर फार शोभून दिसते. या नवरात्रीमध्ये राजस्थानी आणि कोल्हापूरी फुटवे्र ट्रेंड करत आहेत.