काय सांगता? चक्क दीपिकाच्या नावाने लॉन्च केले 70 हजार रूपयांचे हायहिल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:12 IST2019-05-13T17:03:54+5:302019-05-13T17:12:55+5:30

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाइल्स म्हणजे न तुटणारं समिकरण. अनेकदा या अभिनेत्रींचं अनुकरण करूनच अनेक तरूणी आपल्या आउटफिट्सचं कलेक्शन ठरवतात.

Special christian louboutin stilettos named after deepika padukone costs 70 thousand rupees | काय सांगता? चक्क दीपिकाच्या नावाने लॉन्च केले 70 हजार रूपयांचे हायहिल्स

काय सांगता? चक्क दीपिकाच्या नावाने लॉन्च केले 70 हजार रूपयांचे हायहिल्स

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या फॅशन स्टाइल्स म्हणजे न तुटणारं समिकरण. अनेकदा या अभिनेत्रींचं अनुकरण करूनच अनेक तरूणी आपल्या आउटफिट्सचं कलेक्शन ठरवतात. अभिनेत्रींनी कॅरी केलेला लूक काही दिवसांनी त्याचा मार्केटमध्ये ट्रेन्ड सुरू होतो. पण फॅशन वर्ल्डमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे, दीपिका पादुकोणच्या नावाने लॉन्च करण्यात आलेल्या स्टेलेटोजची. याच्या चर्चा जगभरामध्ये होताना दिसत आहेत. 

फ्रेंच फॅशन डिझायनर क्रिस्चियन लुबिटॉन (Christian Louboutin)चे सिग्नेचर असणारे हाय अ‍ॅन्ड रेड कलरचं सोल असणारे स्टेलेटो फुटवेअर आपल्या कलेक्शनमध्ये असावेत असं अनेक तरूणींचं स्वप्न असतं. निदान लुबिटॉनचं संपूर्ण कलेक्शन नाही तर कमीत कमी एक ट्रेडिशनल पंप्स खरेदी करण्याचं तर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का?  क्रिस्चियन लुबिटॉनने बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणच्या नावावरचं एक खास स्टेलेटोज तयार केलं आहे. 

बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी दीपिका ब्रँड कॉन्शिअस असल्याचे आपण सर्वजण पाहतो. एखादा इव्हेंट असो किंवा एअरपोर्ट लूक एकापेक्षा एक महागड्या आणि ब्रँडेड आउटफिट्स, फुटवेअर आणि बॅग्स फ्लॉन्ट करताना ती दिसून येते. दीपिका अनेकदा क्रिस्चियन लुबिटॉनचं फुटवेअर कलेक्शन वेअर करतानाही दिसून आली होती. 

एवढचं नाही तर दीपिकाने आपल्या लग्नामध्ये जे फुटवेअर कलेक्शन वेअर केलं होतं ते,  सब्यसाची X क्रिस्चियन लुबिटॉनने डिझाइन केलं होतं. 

आता लुबिटॉन ने दीपिकाच्या नावाने एक खास स्टेलेटोज डिजाइन केलं असून त्याचं नाव त्याने दीपिक पंप्स असं ठेवलं आहे. पंप स्टाइल असणारे ब्लॅक कलर आणि हाय अॅन्ड हिल्स असणारे फुटवेअरची खासियत आहे त्याचे हिल्स. नॉर्मल स्टेलेटोज प्रमाणे हे हिल्स स्ट्रेट आणि पॉइंटेड नाहीत तर कर्व्ड आहेत.
 
लुबिटॉनने डिझाइन केलेल्या या स्टेलेटोजच्या हिल्सपेक्षआही त्यांची किंमत हैराण करणारी आहे. या क्रिस्चियन लुबिटॉन दीपिका पंप्सची किंमत आहे 995 डॉलर म्हणजेच जवळपास 70 हजार रूपये. 

Web Title: Special christian louboutin stilettos named after deepika padukone costs 70 thousand rupees