दत्तक कन्येच्या विवाह सोहळ्यात भावूक झाले शिवराजसिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 10:43 IST2016-03-04T17:43:36+5:302016-03-04T10:43:36+5:30
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची दत्तक कन्या रिंकी हिचा विवाह सोहळा आज शुक्रवारी पार पडला.

दत्तक कन्येच्या विवाह सोहळ्यात भावूक झाले शिवराजसिंह
म ्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची दत्तक कन्या रिंकी हिचा विवाह सोहळा आज शुक्रवारी पार पडला. विदीशा येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवराजसिंह आणि त्यांच्या पत्नी साधना सिंह यांनी रिंकीचे कन्यादान केले. यावेळी शिवराजसिंह भावूक झाले. रिंकीचे कन्यादान करतानाचा आनंद अभूतपूर्व आहे, असे ते म्हणाले. सुंदरदेवी सेवा आश्रमातून शिवराज यांनी सात मुली आणि दोन मुले दत्तक घेतली आहेत. यापैकी रिंंकी एक आहे. गतवर्षी शिवराज यांची पहिली दत्तक कन्या सोना हिचा विवाह झाला होता.