भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसाचार वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:41 IST2016-01-16T01:15:44+5:302016-02-13T01:41:42+5:30

संपूर्ण जगभरातून भारतातील महिला सुरेक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.  

Sexual harassment of Indian men is increasing | भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसाचार वाढतोय

भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसाचार वाढतोय

शाची राजधानी असूनही दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नाही तर देशातील इतर भागाची स्थिती काय असेल, असा प्रश्न म्हणूनच सातत्याने उपस्थित व्हायला लागला आहे. त्यातच आता एका सर्वेक्षणातून कडवट सत्य बाहेर आले आहे. 'इंटरनॅशनल सेंटर फॉर वुमेन'तर्फे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार भारतातील २५ टक्के पुरुषांनी महिलांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक हिंसाचार केला आहे. हे प्रमाण रवांडा, मेक्सिको, क्रोशिया आणि चिलीसारख्या देशांपेक्षा खूप जास्त आहे.
भारतामध्ये दररोज ९0 महिलांवर बलात्कार होतो. बलात्कारांची ही वाढती संख्या लक्षात घेता वेळीच यावर उपाय करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
भारतीय तरुणांमध्ये लैंगिक हिंसाचार वाढण्यास - घरामध्ये वडिलांना आईला बेदम मारहाण करताना पाहणे, रोडरोमिओंना वेळीच वेसण न घालणे, व्यसनाधिनता - अशी विविध कारणे या सर्व्हेतून पुढे आली आहेत.
भारतीय पुरुषांची मानसिकता समजून घेण्यासाठी दिल्ली आणि विजयवाडा येथील १८ ते ५९ वयोगटातील दोन हजार पुरुषांना बलात्कार, बालपणातील अत्याचार, लैंगिक समानता, नातेसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यातून असे दिसून आले, की लहानपणी दुर्लक्षित किंवा अत्याचार झालल्या पुरुषांमध्ये लैंगिक हिंसाचार बळावतो. चाईल्ड लाईन फाऊंडेशनच्या अनुराधा विद्याशंकर म्हणतात, लहान वयात मुलांना प्रेम, माया, जिव्हाळ्याची गरज असते. खडतर बालपणाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर फार विपरित परिणाम होतो आणि मग त्याच्या हातूनही असेच दृष्कृत्य घडत असते.

Web Title: Sexual harassment of Indian men is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.