'मायग्रेन'वर सापडले रामबाण औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:43 IST2016-01-16T01:11:41+5:302016-02-06T07:43:40+5:30

जशीजशी वैद्यकशास्त्राची प्रगती होत आहे तशी विविध आजारांवर अधिक परिणामकारक इलाज शोधले जात आहेत.

Sail medicine found on 'migraine' | 'मायग्रेन'वर सापडले रामबाण औषध

'मायग्रेन'वर सापडले रामबाण औषध

ीजशी वैद्यकशास्त्राची प्रगती होत आहे तशी विविध आजारांवर अधिक परिणामकारक इलाज शोधले जात आहेत. मायग्रेनमध्ये होणारी तीव्र डोकेदुखी अनेकांसाठी खूप त्रासदायक असते. अशा डोकेदुखीला कारणीभूत अतिसंवेदनशील मज्जातंतू प्रणाली शोधण्यात मेंदूविकारतज्ज्ञांना यश मिळाले आहे. त्यातील अतिसक्रिय पेशींना शांत करणारे औषध आता विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे.या औषधाचे वैशिष्ट्य म्हणजे मायग्रेन सुरू होण्याआधीच त्याला रोखण्याचे काम ते करते. अशा प्रकारचे हे पहिलेच औषध असून पुढच्या वर्षी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. बाजारात जर हे औषध आले तर लाखो लोकांना मायग्रेनच्या जाचापासून कायमची मुक्ती मिळेल. १३00 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे.अमेरिकेतील मायो क्लिनिकचे न्युरोलॉजिस्ट डेव्हिड डॉडिक म्हटले की, 'मायग्रेनकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलणार आहे. जगभरातील सुमारे ७३ कोटी लोकांना याचा त्रास होतो. यामध्ये चार ते ७२ तासापर्यंत प्रचंड डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. तो आता कमी होऊ शकतो'

Web Title: Sail medicine found on 'migraine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.