सुंदर पिचईंच्या सासर्यांचा पुनर्विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:37 IST2016-01-16T01:20:11+5:302016-02-07T14:37:38+5:30
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांचे सासरे 70 वर्षीय ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा हिच्याशी पुनर्विवाह केला आहे.

सुंदर पिचईंच्या सासर्यांचा पुनर्विवाह
ोटा येथील सिव्हिल लाईन्स भागात राहणारे ओलाराम यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. विधूर झाल्याने त्यांना एका साथीदाराचीआवश्कता वाटत होतीच. सुंदर पिचई यांची पत्नी अंजली या ओलारामच्या कन्या आहेत. कोटा येथील शासकीय तंत्र संस्थेतून निवृत्त झालेले ओलराम हे मुंबईत राहतात तर त्यांचे पुत्र व कन्या परदेशात वास्तव्यास आहेत. दुसरीकडे माधुरी शर्मा या देखील विधवा असून त्याचे पती सैन्यात होते. दोघांनी आर्य समाजात लग्न केले. मी या वयात लग्न का करू शकत नाही असा उलटप्रश्न त्यांनी केला आहे. सर्वांना आपले जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. सुंदर पिचईंना मीडियात जागा मिळत असताना त्याच्या सासºयांनीही 'हम भी कम नही' हे दाखवून दिले आहे.