निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 16:21 IST2018-09-02T16:19:05+5:302018-09-02T16:21:00+5:30
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत.

निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत. प्रियांकाच्या या परदेशी रिलेशनच्या चर्चा सर्वत्र होत असतानाच आता तिचा होणारा नवरा निकवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. निकच्या स्टायलिश लूकमुळे तो सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. स्टाइलच्या बाबतीत निक सर्वांना सहज मागे टाकतो. जाणून घेऊयात निकच्या काही स्टायलिश लूक्सबाबत...




