प्रियंका चोप्राच्या ईअररिंगच्या किमतीमध्ये परदेशात लग्जरी हॉलिडे एन्जॉय कराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 15:04 IST2019-08-26T11:49:09+5:302019-08-26T15:04:03+5:30
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याकडे जगभरातील नामांकित ब्रँड्सचे आउटफिट्स, शूज आणि इतर एक्ससरिजचं कलेक्शन आहे.

प्रियंका चोप्राच्या ईअररिंगच्या किमतीमध्ये परदेशात लग्जरी हॉलिडे एन्जॉय कराल
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याकडे जगभरातील नामांकित ब्रँड्सचे आउटफिट्स, शूज आणि इतर एक्ससरिजचं कलेक्शन आहे. त्यांच्या किमतीबाबत न बोलणचं योग्य राहिलं. काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रियंका आपला दिर जो जोनसच्या बर्थडे पार्टिसाठी गेली होती. त्यावेळीचा तिचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. पम जेव्हा प्रियंकाच्या ईअर रिंगची किंमत समोर आली त्यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या.
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी आणि हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणारी प्रियंका त्या लूकमध्ये फार ग्लॅमरस दिसत होती.
तिने आपल्या ब्लॅक शिमरी मिनी ड्रेससोबत जे ईअररिंग्स वेअर केले होते. ते वॉल्टर फेथ ज्वेलरी कलेक्शनचे होते. या डायमंड स्टडेड थ्री ड्रॉप इलॉन्गेटिड चेन लिंक ईअररिंग्सची किंमत 12,650 डॉलर आहे. जर याला भारतीय रूपयांमध्ये कन्वर्ट केलं गेलं तर किंमत 9,04,633 रुपये एवढी होते. ईअररिंग्सच्या किमतीमध्ये एखादी यूरोप टूरच नाही तर कोणत्याही देशात लग्जरी हॉलिडेसाठी जाऊ शकता.
प्रियंकाने यावेळी जो क्लच कॅरी केला होता. तो क्लचही फार महागडा होता. जिमी चू ब्लॅक क्लच ची किंमत 1,850 डॉलर म्हणजेच जवळपास 1,32,529 रूपये होती.