Oscars 2019 : ऑस्कर पार्टीमध्ये प्रियंकाचा ग्लॅमर्स तर, निकचा हॅन्डसम लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:07 IST2019-02-26T16:55:14+5:302019-02-26T17:07:33+5:30

यंदाचा ऑस्कर सोहळा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला. सोहळ्यातील विजेत्यांसोबतच रेड कार्पेटवरील हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. पण लॉस एजिलोसमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक चर्चांमध्ये चर्चा रंगली होती ती म्हणजे बॉलिवडूची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न येण्याची.

Priyanka Chopra and Nick Jonas Attend the Oscars Party where they look gorgeous and handsome | Oscars 2019 : ऑस्कर पार्टीमध्ये प्रियंकाचा ग्लॅमर्स तर, निकचा हॅन्डसम लूक!

Oscars 2019 : ऑस्कर पार्टीमध्ये प्रियंकाचा ग्लॅमर्स तर, निकचा हॅन्डसम लूक!

यंदाचा ऑस्कर सोहळा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला. सोहळ्यातील विजेत्यांसोबतच रेड कार्पेटवरील हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. पण लॉस एजिलोसमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक चर्चांमध्ये चर्चा रंगली होती ती म्हणजे बॉलिवडूची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या न येण्याची. ती या सोहळ्यास उपस्थित नसल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. पण प्रियंकाने अवॉर्ड सेरेमनीनंतर असलेल्या पार्टीला अचानक हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

महत्त्वाचं म्हणजे प्रियंकाने या पार्टीमध्ये पती निक जोनस याच्यासोबत अचानक एन्ट्री घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण याहीपेक्षा पार्टीमध्ये चर्चा होती ती म्हणजे प्रियंका आणि निकच्या हॉट आणि क्लासी लूकची. 

प्रियंकाने पार्टीसाठी ब्लॅक हॉल्टर नेकचा गाउन परिधान केला होता. तर निकने ब्ल्यू पॅन्ट-सूट परिधान केला होता. दोघेही या आउटफिट्समध्ये परफेक्ट कपल दिसत होते. 

प्रियंकाचा हा गाऊन सिम्पल पण क्लासी होता. या गाऊनमध्ये प्रियंका हॉट दिसत होती. दरम्यान प्रियंकाच्या या ब्लॅक गाउनची चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. प्रियंकाने वेअर केलेला स्पार्कलिंग ब्लॅक हल्टर गाउन प्रसिद्ध डिझायनर Elie Saab यांनी डिझाइन केला होता. तिचा हा ड्रेसला ब्लॅक पॅटेन्ट वेस्ट बेल्टसोबतच पॉकेट्स होते. तर निकने सिल्क नेव्गी ब्ल्यू कलरचा सूट, बो आणि टायसोबत वेअर केला होता. 

ऑस्कर अवॉर्डमध्ये प्रियंका आणि निक जोनसचा रोमॅन्टीक अंदाज पहायला मिळाला. प्रियंका आणि निकने 2018मध्ये जोधपूरमध्ये आपली लग्नगाठ बांधली. 

प्रियंका चोप्रा सध्या आपला आगामी चित्रपट 'स्काय इज पिंक'मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये प्रियंका फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

प्रियंकाने ऑस्कर अवॉर्ड सेरेमनी सुरू होण्यापूर्वी मागील वर्षीच्या सोहळ्यातील आपल्या रेड कार्पेट लूकचे फोटो शेअर केले होते. या सोहळ्याला प्रियंकाने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाउन परिधान केला होता.  



 

भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या डॉक्यूमेंटरीला ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाफुड येथे राहणाऱ्या मुलींवर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भारतीय समाजाची मानसिकता आणि महिलांमध्ये असलेली लज्जा अतिशय सखोलपणे मांडण्यात आली आहे. द एन्ड ऑफ सेन्टेन्स असे या चित्रपटाचे नाव आहे. 

पाहूयात निक आणि प्रियंकाचे आणखी रोमॅन्टीक फोटो :

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas Attend the Oscars Party where they look gorgeous and handsome