'तसले' फोटो देण्यासाठी मुलींवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 06:57 IST2016-03-04T13:57:18+5:302016-03-04T06:57:18+5:30

अर्ध्यापेक्षा जास्त कुमारवयीन मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड्स नग्न फोटो देण्यासाठी दबाव टाकतात.

The pressure on the girls to give 'photo' photo | 'तसले' फोटो देण्यासाठी मुलींवर दबाव

'तसले' फोटो देण्यासाठी मुलींवर दबाव

टरनेटवर वाढणारी पोर्नोग्राफीचा मुद्दा सगळीकडेच चर्चिला जात आहे. ‘सायबर बुलिंग’चा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आॅस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले की, अर्ध्यापेक्षा जास्त कुमारवयीन मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड्स नग्न फोटो देण्यासाठी दबाव टाकतात.

‘प्लॅन इंटरनॅशनल’ या ग्लोबर ग्रुपने १५ ते १९ वयोगटातील मुलींचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ८१ टक्के मुलींनी अशा फोटोंची मागणी करणे ‘मान्य नाही’ असे सांगितले. मात्र, ‘पिअर प्रेशर’ म्हणजे मित्रांच्या दबावापोटी मुलींना तसे करणे भाग पडते.

यावेळी ‘आॅनलाईन लैंगिक छळ’बाबत ६०० मुलींच्या सर्व्हेमध्ये ४२० मुलींनी आॅनलाईन लैंगिक छळ होत असल्याचे मान्य केले. डॉ. सिसली मार्स्टन यांनी तरुणांना असे न करण्याचे आवाहन केले. मुलींचा आदर करायला श्किले पाहिजे. शाळेतही याबाबत जागृती पसरिवणे गरजेचे आहे.

Web Title: The pressure on the girls to give 'photo' photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.